आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसच्या किमतीत दरमहा 50 रुपयांनी होणार वाढ, डिसेंबरपर्यंत मुदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीत कपात करण्याचे उपाय शोधत असलेल्या पेट्रोलियम मंत्रालयाने स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती दरमहा 50 रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ही वाढ डिसेंबरपर्यंत असेल. यामुळे डिसेंबरपर्यंत गॅस सिलिंडर 200 रुपयांनी महाग होईल. या माध्यमातून सरकारची 1016 कोटी रुपयांची बचत होईल.

जानेवारीपासून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू होईल. त्या वेळी स्वस्त गॅस सिलिंडरची घोषणा करून मतदारांना आकर्षित करता येऊ शकेल, अशी पेट्रोलियम मंत्रालयाची योजना आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, गॅस सिलिंडर दरवाढीसोबतच केवायसी व थेट बँक खात्यात गॅस सबसिडी आदी योजनांच्या माध्यमातून एका वर्षात 5-6 हजार कोटी रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात मंत्रालय कॅबिनेटकडे प्रस्ताव पाठवणार आहे. कॅबिनेटच्या राजकीय घडामोडी समितीकडून तो मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.