आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lt Governor Najeeb Jung Sets Rs 40 Kg Cap For Onions In Delhi

दिल्लीत कांदा 40 रुपये किलो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुष्काळ पडण्याची शक्यता आणि उत्पादक राज्यांकडून पुरवठा घटल्याने राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांदा किलोमागे 35 ते 40 रुपये झाला आहे. घाऊक व्यापार्‍यांनी सांगितले, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या प्रमुख कांदा उत्पादक राज्याकडून पुरवठा घटल्याने कांद्याच्या किमती वाढत आहेत.

आझादपूर मंडी कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र बुद्धिराज यांनी सांगितले, जून ते सप्टेंबर या काळात उत्तर भारत कांद्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील कांदा पुरवठ्यावर अवलंबून असतो. तेथून पुरवठा कमी झाल्याने किमती वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत कांदा 15 ते 20 रुपये किलो होता.

(डेमो पिक)