आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला वळण लावते लूमाबेल्ट, सरळ बसण्याची आठवण करून देते हे गॅजेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवस्थित न बसल्यामुळे पाठदूखीसारख्या समस्या आपल्याला भेडसावत असतात. मात्र तरीही पाठीचा कणा सरळ ठेवून बसणे आपल्या लक्षात राहत नाही. तुमची हिच अडचण दूर करण्यासठी बाजारात एक गॅजेट दाखल झाले आहे. या गॅजेटचे नाव लूमाबेल्ट आहे. बेल्टप्रमाणे हा बेल्ट कमेरेवर बांधावा लागतो. लगेच हे उपकरण स्टार्ट होते. तुम्ही सरळ बसला नाहीत तर हे गॅजेट व्हायब्रेट होते आणि तुम्हाला सरळ बसण्याची सूचना देते. या गॅजेटचे वैशिष्ट म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीचीही माहिती देणारे याचे तंत्रज्ञान. तुम्ही किती वेळ खाली वाकून बसता, किती वेळा शरिरावर ताण येईल असे बसता, किती वेळा सरळ उभे राहता ही सर्व माहिती लूमाबेल्ट एका सेंकदात दाखवते. एवढेच नाही तर तुमच्या बसण्याच्या पद्धतीला हे अ‍ॅप गुणही देते. यामुळे सरळ बसणे सहज शक्य होते. कपड्याच्या आत असल्याने याचा वापर करणेही सोपे आहे. सध्या हे गॅजेट भारतात उपलब्ध नसले तरी लवकरच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.