आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात आलिशान मोटारींचा प्रवास महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बीएमडब्ल्यू, ऑडीच्या पावलावर पाऊल ठेवत आता जर्मनीतील आघाडीची मर्सिडीझ बेंझ या कंपनीनेदेखील आपल्या सर्व मोटारींच्या किमतीत पुढील महिन्यापासून 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिक मंदीमुळे मोटार कंपन्यांच्या व्यवसायावर ताण येत आल्याने बीएमडब्ल्यू आणि ऑडी या कंपन्यांनी जानेवारीपासून किमती वाढवण्याचे अगोदरच जाहीर केले आहे, परंतु मर्सिडिझने मात्र किमती वाढवण्याचे कारण स्पष्ट केले नाही.
ए क्लास आणि बी क्लास गटातील छोट्या मोटारी, सी क्लास गटातील सेडान, इ- क्लास आणि एस क्लास, एसएलएस एमएमजी स्पोर्ट्स मोटार यांच्यासह सर्व लक्झरी आणि स्पोर्ट्स मोटारींच्या किमती वाढवण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या अगोदरच्याच आठवड्यात होंडा कार्स इंडिया लिमिटेडनेदेखील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्या सर्व वाहनांच्या किमती वाढवण्याचा इरादा व्यक्त केला होता. चलन बाजारातील चढ- उतार आणि महागाई याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर झाल्याचे होंडा कार्सने म्हटले आहे.