आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्झरी कार खरेदीसाठी आता अनेक पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील महिनाभरात तीन दिग्गज सॅलून कार बाजारात आल्या. यात ऑडी आरएस 5, न्यू ऑडी एस 6 आणि मर्सिडीझ ई 63 एएमजी या कारचा समावेश आहे. यापैकी ऑडी आरएस 5 ही कार दोन जुलै रोजी बाजारात आली. या तीन कारमध्ये अनेक बाबी समान आहेत. या सर्व कार 400 हॉर्सपॉवरपेक्षा अधिक शक्तीच्या आहेत. यात आठ सिलिंडरचे इंजिन देण्यात आले आहे. मात्र, या कार चालवण्याचा आनंद लुटण्यासाठी 95 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे.

या तीन कारमध्ये आणखी एक साधर्म्य आहे. या सर्व कार नियमित सॅलून आणि कुपेवर आधारित आहेत. ऑडीने ए 5 आणि ए 6 च्या आधारावर आरएस 5 आणि आसएस 6 या कार तयार केल्या आहेत. तर मर्सिडीझचे ई 63 मॉडेल कंपनीचे लोकप्रिय मॉडेल ई-क्लासचे स्टायलिश व्हर्जन आहे.

या तीनपैकी आरएस 5 ही कार स्पोर्टस कार असल्याने लूकमध्ये थोडी उजवी वाटते. यात 4.2 लिटरचे व्ही-8 इंजिन देण्यात आले आहे. सुपरकार आर-8 मध्येही याच इंजिनाचा वापर होतो. 444 बीएचपी शक्तीच्या इंजिनाची क्षमता 8250 आरपीएम आहे. यामुळे ही कार अवघ्या 4.6 सेकंदांत तासाला 100 किलोमीटर वेग घेते असा कंपनीचा दावा आहे. याबाबतीत ही कार पोर्शेशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.

चार दरवाजांची कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर ऑडीने एस-6 कार आणली आहे. क्षमतेच्या बाबतीत ही कार ए-6 सेडानप्रमाणे आहे. कंपनीने या कारमध्ये 4.0 लिटर क्षमतेचे ट्विन टर्बो इंजिन दिले आहे. या इंजिनाची शक्ती 415 बीएचपी आहे. यात 56 केजीएम टॉर्क देण्यात आला आहे. अवघ्या 4.6 सेकंदांत ही कार तासाला 100 किलोमीटरचा वेग घेते, असे कंपनीचे म्हणणे आहे. कारची फायरिंग एवढी मंद आहे की या कारची महत्त्वाची वैशिष्ट्ये डोळ्यांना जाणवत नाहीत. याचे पुढील भागाचे ग्रिल क्रोम आणि अ‍ॅल्युमिनियमचे आहे. मागच्या भागात स्पॉयलर लावलेले आहे. ए-6 च्या तुलनेत या कारमध्ये जास्त शक्तीचे इंजिन आहे हे लक्षात घेऊन मोठी चाके आणि हलके टायर देण्यात आले आहेत. सस्पेन्शन मजबूत असून फारसे धक्के जाणवत नाहीत.

मर्सिंडीझची सहयोगी कंपनी एएमजीने ई-63 एएमजी तयार केली आहे. याच एएमजीचे 5.5 लिटरचे ट्विन टर्बो इंजिन वापरण्यात आले आहे.त्यामुळे 557 बीएचपी शक्ती निर्माण होते. यात रेल्वेप्रमाणे 73.4 केजीएमचा टॉर्क वापरला आहे. तसेच जास्त हॉर्सपॉवर लक्षात घेऊन चांगल्या नियंत्रणासाठी जास्त शक्तीचे ब्रेक वापरले आहेत. स्टाइलच्या बाबतीत यात एएमजी बॉडी किटची वैशिष्ट्ये दिसून येतील. यात अ‍ॅग्रेसिव्हली स्टाइल्ड फ्रंट बम्पर, लिफ्टवर नियंत्रणासाठी स्प्लिटर, मागच्या बाजूने चार सायलेन्सर, एएमजीची चाके देण्यात आली आहेत.

या सर्व कार सध्याच्या लक्झरी सॅलून कारच्या ताफ्यात समाविष्ट होतील. यात बीएमडब्ल्यूच्या एम श्रेणीच्या कार, जग्वारच्या एक्सएफआर सुपर सेडान आणि पोर्शेती पॅनोरामा जीटीएस यांचा समावेश आहे.

मोठी रक्कम खर्चून सर्व सुविधा एकाच कारमध्ये मिळवण्याची इच्छा असणार्‍या खरेदीदारांसाठी आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कबीर महाजन
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.