आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉफ्टर फीचर्स' असलेली जबरदस्‍त कार लॉंच, किंमतही जबरदस्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीची लक्‍जरी कार कंपनी मर्सिडीजने बेंझने आपली प्रीमिअम सेदान कार ई 63 एएमजी भारतात लाँच केली आहे. 1.29 कोटी रूपये किंमत असलेल्‍या या लक्‍जरी कारमुळे कंपनीला भारतातील आपली स्थिती आणखी मजबूत होण्‍याचा विश्‍वास आहे.

मर्सिडीजच्‍या या कारचा स्‍पोर्टी लुक आहे. कारमध्‍ये 5.5 लीटर व्‍ही 8 बीटबरे इंजिन आणि एएमजी एक्‍झॉस्‍ट सिस्टिम लावण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर ई-63मध्‍ये 558 पीएसची क्षमतेबरोबर 720 एनएमचा टॉर्क देण्‍यात आला आहे.

मर्सिडीज बेंझ इंडियाचे मुख्‍य संचालक आणि सीईओ एबरहर्ड केर्न यांनी नव्‍या ई-63 एएमजी सादर केली. भारतात आकर्षक कार आणण्‍यास कंपनी प्रतिबद्ध असल्‍याचे त्‍यांनी यावेळी म्‍हटले. कंपनीने नुकताच भारतात ए क्‍लास, बी क्‍लास (डीझेल) आणि सेदान ई क्‍लासची नवी आवृत्ती सादर केली आहे. ई-63 एएमजीमुळे कंपनीची भारतातील स्थिती आणखी मजबूत होईल असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

ऑटोमेटेड 7 स्‍पीडबरोबर ही कार लॉंच करण्‍यात आली. या कारला 0 ते 100 किमीचा वेग पकडण्‍यास केवळ 4.2 सेकंद लागतात. मर्सिडीजच्‍या कारमध्‍ये अ‍ॅक्टिव्‍ह पार्किंग असिस्‍ट, अंटेन्‍शन असिस्‍ट, एलईडी लॅम्‍प आणि शानदार फ्रंटही आहे. यातील अनेक फीचर्स हे लक्‍जरी जेट किंवा हेलिकॉप्‍टरमध्‍ये आढळतात.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कशी आहे, ही लक्‍जरी कार, काय-काय आहेत यामध्‍ये फीचर्स...