आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • M Tech Company Will Start Development Center In Pune

एमटेक इंकचे पुण्‍यात विकास केंद्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अमेरिकेत २२ कोटी डॉलर उलाढाल असलेल्या एमटेक इंक या कंपनीने बेंगळुरनंतर भारतातील दुसरे विकास केंद्र पुण्यात सुरु केले आहे. येत्या तीन ते पाच वर्षात १०० कोटी डॉलर उलाढालीचे उद्दिष्ट ठरविल्‍याची माहिती अध्यक्ष दिनेश देसाई यांनी दिली.

सल्लासेवा क्षेत्रात विकेंद्रित पद्धतीने निर्णय प्रक्रिया राबविणारी कंपनी असल्‍याचे नमूद करून भारतात व्यवसाय विस्तारामागची भूमिका स्पष्ट करताना देसाई म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान सेवा आणि उत्पादने वापरणारी जगातील ग्राहक संख्या ७०० कोटी आहे. त्यातील मोठा हिस्सा आशियाई देशात म्हणजे भारतात आहे. पुण्यासारख्या शहरात मिळणारे कुशल मनुष्यबळ आणि व्यवसाय संधी म्हणून कंपनी येथे येत आहे.

विकेंद्रीत निर्णय पद्धत कशी अंमलात येते हे सांगताना ते म्हणाले की, एखाद्या ग्राहक कंपनीचे काम स्वीकारण्याचा अधिकार वाटाघाटी करत असलेल्या अभियंता अधिकाऱ्याला घेण्याची मुभा कंपनी देतो. त्यामुळे वेळेची बचत तर होतेच याशिवाय परस्पर विश्वास वाढतो.

अप्लिकेशन डेव्हलपमेंट, पॅकज्ड अप्लिकेशन, आयटीसाठी पायाभूत सुविधा, क्लाउड आधारित सेवा ही कंपनीची वैशिष्ट्ये आहेत. ते म्हणाले की, जगातील ग्राहकांना येथून सेवा दिल्या जाणार आहेत. १९६४ मध्ये झालेली ही कंपनी पर्यटन, वाहतूक, माध्यमे, बँक आणि वित्तसेवा, रिटेल, वाहन, शिक्षण या क्षेत्रात सल्ला सेवा देते. अमेरिका, कॅनडा आणि भारतासह १४ शहरात असून फोर्च्युन फाईव हंड्रेड यादीतील कंपन्या एमटेक इंकच्‍या ग्राहक आहेत. कुशल मनुष्यबळामुळे भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगातील आघाडी कायम राहणार आहे.

कंपनीने कोवेलिक्ससह दोन वर्षात सात कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. सध्या पुण्यात सुमारे २०० लोक काम करत असून ही संख्या आगामी काळात वाढणार आहे. एच वन बी व्हिसावर येणारे प्रस्तावित निर्बंध पाहता कंपनीचा भारतात व्यवसाय विस्तार फायद्याचा ठरेल, असा विश्‍वास देसाई यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.