आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई विवरणपत्र भरण्‍यात महाराष्‍ट्र-गुजरात आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्रात सुमारे 11 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 42. 5 लाख लोक प्राप्तिकर भरतात असे असले, तरी महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये देशात ई विवरण पत्र भरण्यात सर्वात आघाडीवर असल्‍याची माहिती ई मुंद्रा कन्झ्युमर सर्व्हिसेस कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक कलैवनी चित्तरंजन यांनी दिली.

पगारदार करदात्यांना प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यास अवघे आठ दिवस (31 जुलै अखेरचा दिवस) राहिले आहेत या पार्श्वभूमीवर माहिती देताना त्या म्हणाल्या, की आमच्या बंगलोरस्थित कंपनीने या क्षेत्रात2006 मध्ये सेवा देण्यास प्रारंभ केल्यापासून सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्र, गुजरातेत मिळाला आहे. अर्थ मंत्रालयाने डिजिटल सही पासून ते विवरणपत्र सुविधा देण्याचे अधिकृत परवाना दिलेल्या चार संस्थांपैकी आम्ही एक आहोत. आम्ही अशा सेवा देण्याबाबत 12 पेटंट मिळविली आहेत. ई पद्धतीने करविषयक कागदपत्रे सादर करण्यास भविष्यात वरील दोन राज्यात मोठा वाव आहे. त्यातून करदात्यांची संख्या वाढेल आणि पर्यावरणाची जपणूक होणार आहे.

ई पद्धतीने विवरणपत्र भरणे विना कटकटीचे आणि जादा भरलेल्या कराचा परतावा लगेच देणारे असल्याने मार्ग वापरणाऱ्या करदात्यांची संख्या यंदा महाराष्ट्रात 30-40 टक्के वाढेल असा अंदाज आहे. त्या म्हणाल्या, की कंपनी मोबाईल वालेट सुविधा सध्या दक्षिणेतील काही शहरात चाचणी प्रकल्प म्हणून राबवत असून लवकरच महाराष्ट्रातील चार ते पाच शहरात ती सुरु केली जाणार आहे.

करदात्यानो या चुका टाळा
ई पद्धतीने विवरणपत्र भरताना काय काळजी घ्यावी काही सूचना त्यांनी केल्या त्या पुढीलप्रमाणे
1 ) कायमचा खाते क्रमांक ( PAN) अचूक लिहा
2 ) आय टी आर सर्व रकाने भरा
3 ) कर किती भरायचा याची मोजणी अचूक करा
4 ) सरकारने दिलेली तारीख पाळा
5 ) डिजिटल सही वृद्धांना फायद्याची