आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Bank Starts Mahasara Scheme Frome September

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र बँकेची महाआसरा योजना सुरू होणार सप्टेंबरपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असणार्‍या बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने चालू आर्थिक वर्षात नव्या शाखांच्या जोडीने ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआसरा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सप्टेंबर 2013 पासून होईल, अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेने 90 टक्के निव्वळ नफा मिळवला आहे, असे सांगून नरेंद्रसिंह म्हणाले, नफ्याचा आकडा 266.33 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी हे प्रमाण 140.46 कोटी रुपये होते. बँकेच्या एकूण ठेवींमध्ये 32 टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या एकूण व्यवसायात 36 टक्के वाढ झाली असून उलाढाल 188457 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआसरा योजना रिव्हर्स मॉर्गेजवर आधारित आहे. ती पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी एका आठवड्यात एका वेळी दोन कोटी रुपयांचा रोख भरणा आणि 50 लाख रुपयांची रक्कम काढण्याची सुविधा घरपोच दिली जाणार आहे. त्यासाठी प्रती दोन लाख रुपयांसाठी 125 रुपये शुल्क आकारले जाईल.

सदनिका खरेदी करताना द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क सहज देता यावे यासाठी निबंधक कार्यालयाजवळच्या बँकेच्या शाखेत तशी सुविधा सुरू केली जाणार आहे.


2200 कोटींची मागणी
बँकेची भांडवली गरज भागवण्यासाठी 2200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. ती रक्कम सप्टेंबरमध्ये मिळण्याचा अंदाज आहे. नरेंद्र सिंह, सीएमडी, बँक ऑफ महाराष्ट्र.