आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Develops Aadhar linked E locker For Crucial Documents

आता कागदपत्रे ठेवा ई-लॉकरमध्ये सुरक्षित; प्रायोगिक तत्त्वावर सुविधा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र सरकारने ई-लॉकर ही सुविधा सुरू केली आहे. या ई-लॉकरमध्ये जन्म, लग्न, आयकर, पदवी, जातीशी संबंधित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करता येतील. यामुळे शिक्षण किंवा नोकरीसाठी गरज भासल्यास सरकारकडून जारी कागदपत्रांच्या ओरिजनल कॉपीची गरज भासणार नाही.

राज्य सचिवालयाचे आयटी विभाग संचालक वीरेंद्र सिंह म्हणाले, राज्यात ई-गव्हर्नन्समध्ये खूप विकास केला आहे. आधार कार्डधारक elocker.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून कागदपत्रे स्कॅन करून प्रती सुरक्षित ठेवू शकतात. ई-सुविधेशी संबंधित नोकरीधारक त्यांच्या कार्यालयातून दस्तऐवज घेऊ शकतात. यासंबंधीचा पथदर्शी प्रकल्प वर्ध्यात सुरू आहे.

पासवर्डने ऑपरेट : दस्तऐवजांसाठीनोंदणी करताच ग्रामपंचायत, तहसील जिल्हाधिकारी याची कॉपी अपलोड करतील. या प्रक्रियेसाठी लॉगइन करतेवेळी वन टाइम पासवर्ड युजरच्या मोबाइलवर पाठवला जाईल.
असे पाठवा दस्तऐवज : नोकरीकिंवा शिक्षणात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे थेट पाहता यावी म्हणून या प्रकल्पाशी निगडित शैक्षणिक संस्था आणि एम्प्लॉयरला दोन वेगवेगळे पासवर्ड आणि खास लिंक दिल्या जातील.