आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने केला 6,325 कोटींचा व्यवसाय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - महाराष्ट्र ग्रामीण बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये सर्व आघाड्यांवर देदीप्यमान यश मिळवले आहे. बँकेच्या ताळेबंदास संचालक मंडळाने 27 एप्रिलच्या बैठकीमध्ये मान्यता दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष फिलीप डिसिल्वा यांनी दिली.

ते म्हणाले, मार्चअखेर बँकेने एकूण 6,325 कोटींचा व्यवसाय केला असून प्रतिशाखा व्यवसाय 18.02 कोटींचा आहे. बँकेने 3,807 कोटी रुपयांच्या ठेवी संकलित केल्या असून त्याचा वृद्धिदर 19.12 टक्के आहे. कर्जाची 2,518 कोटींची रक्कम येणे असून त्यात 38 टक्के वाढ झालेली आहे. बँकेच्या एकूण कर्ज वितरणापैकी 1,242 कोटी प्राधान्य क्षेत्रासाठी वितरित केले आहेत.

यात पीक कर्जासाठी 913 कोटी वितरित झाले आहे. सोळा जिल्ह्यांत बँकेच्या 351 शाखा कार्यरत आहेत. गतवर्षी बँकेने महिला बचतगटांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल बँकेला नाबार्डकडून गौरविण्यात आले. आगामी वर्षात 30 नवीन शाखा उघडण्याची महाराष्ट्र ग्रामीण बँकेची योजना आहे.