आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर क्षेत्राची भरीव कामगिरी, 51 हजार कोटी रुपयांची निर्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मंदी असतानाही महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर क्षेत्राने भरीव कामगिरी केली असून गेल्या वर्षी 51 हजार कोटी रुपयांची निर्यात केली आहे. यात एकट्या पुणे विभागाचा हिस्सा २ ९ हजार कोटी रुपये आहे. आगामी 2020 सालापर्यंत देशाची एकूण निर्यात 700 अब्ज डॉलर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या कामगिरीची माहिती देताना सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे महासंचालक ओंकार राय पत्रकार परिषदेत म्हणाले, की माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला दिलेली प्राप्तिकर सवलत 2011 मध्ये संपल्यानंतर सॉफ्टवेअर क्षेत्राने कामगिरी केलेली असल्याने निश्चित कौतुकास्पद आहे. गेल्या वर्षी झालेली एकूण निर्यात दोन लाख 51 हजार कोटी रुपयांची आहे.

मंदी असताना 7.2 टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि पुण्याचा त्यातील वाटा मोठा आहे मात्र या व्यावसायिकांच्या मागण्या आणि अडचणी लक्षात घेऊन एकच नियामक यंत्रणा असणे गरजेचे आहे. पुण्यातील छोट्या आणि मधयम आकराच्या उद्योजकांना नियम आणि अटी पाळताना अनेक अडचणी येतात त्यासाठी त्यांनी 30 मागण्यांचे निवेदन आम्हाला दिले आहे. त्याचा विचार करून अर्थ मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

पुणे हे बंगलोर पाठोपाठ भारतात आणि आशियात वेगाने वाढणारे आयटी केंद्र बनते आहे. ते आणखी वाढावे यासाठी पायाभूत सुविधा आणि सवलती आवश्यक असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशपातळीवर माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रासाठी एकच प्राप्तिकर संचालनालय असावे अ शी सूचना आम्ही केंद्राला केली आहे. महाराष्ट्रात नाशिक, नागपूर सारख्या शहरात येत्या दोन ते तीन वर्षात नव्या उद्योजकांसाठी दहा लाख चौरस फूट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क विकसित केले जाणार आहेत असे नमूद करून ते म्हणाले की पुण्यात सध्या 40 हजार चौरस फूट जागा असून त्यातील 13 हजार चौरस फूट नव्या उद्योजकांसाठी उपलब्ध आहे.