गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; / गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; 14 लाख 73, 466 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

वृत्तसंस्था

Apr 04,2014 05:46:00 AM IST

नवी दिल्ली- उद्योगांची मोठ्या गुंतवणुकीसाठी पहिली पसंती कुणाला, या प्रश्नावर अशात गुजरातचे नाव अग्रक्रमावर होते. मात्र आता गुुंतवणुकीची गंगा महाराष्ट्रात अगदी भरभरून वाहत आहे. सर्वाधिक गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. उद्योगजगतातील अग्रगण्य संघटना ‘असोचेम’च्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर 2013 पर्यंत महाराष्ट्राने 14 लाख 73 हजार 466 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळवले आहेत. या काळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा कमी म्हणजे 13 लाख 98 हजार 347 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आकर्षित करण्यात यश आले. डिसेंबर 2011 पर्यंत गुजरातने 16 लाख 28,126 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळवले होते. महाराष्ट्राने याच काळात 14 लाख 13,728 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आकर्षित केले.

X
COMMENT