मुंबई- राज्यातील ट्रक मालकांनी आज (मंगळवार) रात्री 12 वाजेपासून चक्का जाम आंदोलनाला हाक दिली आहे. एस्कॉर्ट शुल्काविरुद्ध ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा झाली. मात्र त्यावर तोडगा निघू शकला नाही.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने संबंधित 225 पेक्षाजास्त ट्रक असोसिएशन या आंदोलनात सहभागी होणार आहे. ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष मलकीत सिंह यांनी मधुकरराव चव्हाण यांची भेट घेतली. सरकारने एस्कॉर्ट टॅक्स बंद करण्यासाठी एक महिन्याचा मुदत मागितली आहे. परंतु ट्रक मालक आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून सुमारे 20 लाखांहून अधिक ट्रक 'चक्का जाम' आंदोलनात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, राज्यातील सर्वच जिल्ह्यात एस्कॉर्ट शुल्क वसूल केले जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वर्षापूर्वी एस्कॉर्ट समाप्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, शासनाचा 'गोरखधंदा'च आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसला एस्कॉर्ट शुल्काबाबत आश्वासन दिले आहे. तरी देखील ट्रक मालिक आंदोलन छेडले तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री मधुकर राव चव्हाण यांनी दिला आहे.