आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahendra And Mahendra Agricultur Instrument Division Launch Two Swaraj Tractors In Market

महिंद्रा अ‍ॅँड महिंद्राच्या कृषी उपकरण विभागाचे दोन ‘स्वराज’ ट्रॅक्टर बाजारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्‍ट्रातल्या शेतक-यांसाठी महिंद्रा अ‍ॅँड महिंद्राच्या कृषी उपकरण विभागाने ‘स्वराज’ या नावाने दोन नवीन ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत. सामान वाहून नेण्याची क्षमता जास्त वाढवण्याच्या दृष्टीने हे दोन्ही ट्रॅक्टर्स अधिक शक्तिमान असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

‘स्वराज 855 एक्सएम’ आणि ‘स्वराज 744 एक्सएम’ असे हे दोन ट्रॅक्टर आहेत. हे दोन्ही ट्रॅक्टर 40 ते 50 एचपी श्रेणीतले असल्यामुळे त्यांची खेचण्याची व सामान वाहून नेण्याची क्षमता जास्त आहे. त्याचबरोबर ‘एक्स्ट्रा मायलेज’ (एक्सएम) देण्यासाठी या वाहनांमध्ये अत्याधुनिक इंधन कार्यक्षम इंजिन बसवण्यात आले आहे. शेतीकामाच्या दृष्टीने कॉँस्टंट मेश, साइड शिफ्ट गिअर बॉक्स, अत्याधुनिक सेन्सिलिफ्ट हायड्रॉलिक आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. उत्पादकता वाढवणे व वाजवी किमत या उद्देशाने हे दोन ट्रॅक्टर बाजारात आणण्यात आल्याचे कंपनीच्या कृषी उपकरण विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव गोयल यांनी सांगितले.