आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahendra Launch Pantero And Centure Its New Motorcycle

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्राची पँटेरो व सेंच्युरो या नव्या मोटारसायकली बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - तरुणाईची मोटारसायकलबाबतची वाढती क्रेझ लक्षात घेऊन महिंद्रा टू व्हीलर्सने शंभर सीसीच्या महिंद्रा पँटेरो आणि महिंद्रा सेंच्युरो अशा दोन नव्या मोटारसायकली सादर केल्या आहेत. या वाहनांचे संपूर्ण डिझाइन विक्रमी 18 महिन्यांत पुण्यातील संशोधन व विकास केंद्रात करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष (विक्री आणि ग्राहक सेवा) धर्मेंद्र मिश्रा यांनी येथे दिली.ग्राहकांच्या गरजांचा नेमका विचार करून या नव्या मोटारसायकली सादर केल्या आहेत, असे सांगून मिश्रा म्हणाले, मध्यमवर्ग हा आमचा प्रमुख ग्राहक आहे. त्यांच्यासाठी पँटेरो बाजारात दाखल झाली असून, सेंच्युरो मार्चमध्ये येईल.


मोटारसायकलींची फीचर्स
* वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षा प्रणाली
* फ्लिप की
* सेंट्रल लॉकिंग अँटी थेफ्ट सिस्टिम
79.5 किमी मायलेज प्रतिलिटर
पँटेरो 45199 रु. किमत
सेंच्युरो 44190 रु. किमत