आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahendra's Charging For Reva E 2 O Electric Cars

‘रेव्हा ई 2 ओ’ इलेक्ट्रिक कारसाठी महिंद्राचे ‘चार्जिंग’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणारे अनुदान रद्द करण्यात येऊनदेखील वाहन निर्मितीत आघाडीवर असलेली महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा मात्र नव्या दमाची इलेक्ट्रिक मोटार बाजारात येण्यासाठी ‘चार्ज’ झाली आहे. बहुप्रतीक्षित ‘ई 2 ओ’ ही नव्या पिढीची इलेक्ट्रिक मोटार बाजारात आणण्यासाठी 18 मार्चचा मुहूर्त निश्चित झाला आहे; परंतु या मोटारीची किंमत मात्र अद्याप जाहीर झालेली नाही.

इलेक्ट्रिक मोटारींसाठी आवश्यक असलेल्या बॅटरी तसेच अन्य काही महत्त्वाचे सुटे भाग आयात करण्यासाठी लाभ देण्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मान्य केलेले आहे. नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन या या राष्‍ट्रीीय मोहिमेंतर्गत 2020 पर्यंत भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहने उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. परंतु सध्याच्या घडीला तरी ‘रेव्हा ई 2ओ’ मोटारीला मात्र कोणतेही लाभ मिळालेले नाहीत.
लिथियम लोन बॅटरीचा उपयोग केलेली ही मोटार पूर्ण चार्ज झाल्यानंतर ताशी 100 किलोमीटर वेगाने धावू शकेल. शहरी प्रवाशांसाठी ही मोटार जास्त उपयोगाची ठरणार आहे. ही मोटार गेल्या वर्षी झालेल्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनात मांडण्यात आली होती. स्वच्छ आणि हरित पर्यावरणाचा विचार करून ही इलेक्ट्रिक मोटार बाजारात आणण्यात येणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह आणि कृषी उपकरण विभागाचे अध्यक्ष पवन गोएंका यांनी सांगितले.


महिंद्रा रेव्हाच्या अलीकडेच उद्घाटन झालेल्या बंगळुरू येथील प्रकल्पात या प्रस्तावित नव्या मोटारीचे उत्पादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची वर्षाला 30 हजार मोटारींचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. या मोटारीला 15 एएमपी प्लग पॉइंट असल्यामुळे या मोटारीची बॅटरी घरी किंवा कार्यालयातही
चार्ज करता येऊ शकणार आहे. याशिवाय यामध्ये ‘सन 2 कार’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.