आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू मॉडेल: महिंद्राची \'सेंच्युरो\' बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हीरोसाठी पॅशन आणि होंडासाठी ड्रीम युगा जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महिंद्रासाठी 'सेंच्युरो' ही मोटरसायकल महत्त्वपूर्ण आहे. स्टालियो फारशी समाधानकारक नसतानाही ग्राहकांच्या सूचनांची जाणीव ठेवत महिंद्राने नवी दुचाकी लाँच केली आहे.

महिंद्राने डेहराडूनमध्ये 'सेंच्युरो' लाँच केली. तसेच स्टालियो मॉडेलमध्ये बरेच बदल करून पेंटेरो बाइक सादर केली. केवळ आकर्षक लूक पाहून ग्राहक आकर्षित होत नाही हे जाणून कंपनीने 'सेंच्युरो'मध्ये नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. यात अँग्युलर हेडलाइट क्लस्टर असून एलईडी पायलट लॅम्प्स बसवण्यात आले आहेत. मोटारसायकलच्या इंधन टाकीची क्षमता 12.7 लिटर आहे. चालकासाठी ही बाइक आरामदायी आहे. ब्रेक लॅम्प एलईडीचे असून टेकोमीटर 12000 आरपीएमपर्यंतची आकडेवारी दाखवू शकते. ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने चालवल्यास ही बाइक चांगले मायलेज देते. गाडीच्या सर्व लॉकसाठी एक चावी देण्यात आली असून चावीत एलईडी लावण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी या चावीचे एक बटण दाबले की गाडीचे लाइट सुरू होतील. इग्निशन बंद केल्यानंतरही मोटारसायकलचे लाइट काही सेकंदांपुरते सुरूच राहतात हे या दुचाकीचे वैशिष्ट्य आहे. यामुळे मोटारसायकल अंधारात उभी केल्यानंतर तेथे प्रकाश राहील. ब्रेक सिस्टिममध्ये 130 मिमीची जोडी ड्रममध्ये देण्यात आली आहे. बाइकमध्ये पॉवरफुल ब्रेकची कमतरता आहे. ही बाइक फ्रंट डिस्क ब्रेक प्रकारातसुद्धा उपलब्ध आहे.
किंमत- Rs. 50000/-

महिंद्रा 'सेंच्युरो'चे फिचर्स आणि फोटोज् जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा..