आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात डिझेलवर चालणा-या छोट्या (कॉम्पॅक्ट) कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. स्विफ्ट पहिल्यांदा बाजारात आल्यानंतर त्याच्या डिझेल मॉडेलची मागणी (वेटिंग लिस्ट) पूर्ण काळ कायम होती. नव्या स्विफ्टच्या बाबतीतही हेच कल पाहायला मिळाले. त्यापेक्षा मोठे मॉडेल डिझायरची कथाही यापेक्षा वेगळी नाही. या महिन्याच्या सुरुवातीला अल्टोला मागे सारून डिझायरने सर्वाधिक विक्रीचा मान मिळवला आहे. इतर कारच्या कथाही अशाच आहेत. गेल्या दशकात टाटाची इंडिका कार सर्वाधिक विकली जाणारी डिझेल कार होती. नुकतीच बाजारात आलेल्या होंडाच्या अमेझनेही याच पद्धतीचे यश मिळवण्याची आशा दाखवली आहे.
तुम्ही एका चांगल्या डिझेलवर चालणा-या छोट्या कारच्या शोधात असाल तर एक चांगली बातमी आहे. महिंद्रा अँड महिंद्राने व्हेरिटो व्हाइबसब छोट्या कारच्या बाजारात प्रवेश केला आहे. महिंद्राने दोन वर्षांपूर्वीच व्हेरिटोवर आधारित चार मीटरपेक्षा कमी लांबीची सेडान बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. कंपनीने नुकतीच मुंबईत ही छोटी कार सादर केली. एसयूव्ही डिझेलच्या बाजारात महिंद्राची चांगली चलती आहे. या श्रेणीत इतर कंपन्यांच्या तुलनेत महिंद्राची विक्री जास्त आहे. मात्र, स्थिती फारशी समाधानकारक नाही. आगामी काळात स्पर्धा वाढण्याबरोबरच या एसयूव्ही क्षेत्रातील कंपनीचा दबदबा घटू शकतो याची जाणीव महिंद्राने व्यक्त केली होती. 31 मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत एसयूव्ही सेगमेंटमधील कंपनीची हिस्सेदारी 48 टक्क्यांवर आली. गेल्या वर्षी याच काळात हा वाटा 56 टक्के होता. प्रवासी कारच्या सेगमेंटवर लक्ष देण्यासाठी कंपनीकरिता ही योग्य वेळ आहे. या क्षेत्रात महिंद्राचा हिस्सा एक टक्क्याहूनही कमी आहे. व्हेरिटो व्हाइब यशस्वी होणार असा अंदाज व्यक्त होत आहे. नावावरूनच ही व्हेरिटो सेडानवर आधारित आहे. व्हेरिटो ही एक आरामदायी कार आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद यासारख्या शहरात या कारचा एसी कॅबच्या रूपात वापर होत आहे. किमतीच्या तुलनेत यात भरपूर जागा आणि आराम आहे. या कारमध्ये 1.5 लिटरचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. यावर एक्साइज ड्यूटीचा लाभही मिळणार आहे. त्यामुळेच अत्यंत आक्रमक किमतीत ती बाजारात उतरवणे महिंद्राला शक्य झाले. मुंबईत या कारची एक्स शो रूमप्रारंभी किमत 5.63 लाख रुपये आहे.
व्हाइबच्या रूपाने आता छोट्या कारच्या बाजारात महिंद्रा काही दिग्गज कंपन्यांना स्पर्धा देण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात सध्या मारुती, ह्युंदाई यांची आघाडी आहे आणि यात हिस्सा मिळवण्यासाठी इतर कंपन्यांचे प्रयत्न सुरूच असतात. डिझेलवर चालणा-या छोट्या कारच्या यशाबाबत अमेरिकेच्या दिग्गज कंपन्या फोर्ड आणि जीएम यांना कटू अनुभव आलेला आहे. मात्र, होंडाच्या विक्रीत झालेल्या वाढीमुळे छोट्या कारच्या घसरणा-या बाजाराकडून महिंद्राला आशेचा किरण आहे.
एंट्री लेव्हलच्या कार खरेदीदाराला उत्तम पर्याय म्हणून व्हेरिटो व्हाइबच्या माध्यमातून महिंद्रा कार सादर केली आहे. ही कार दिसायला छोटी आहे, मात्र आतून मोठी आहे.
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.