आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahindra First Choice Start First Car Maintenance Center In Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्रा फर्स्‍ट चॉईस कंपनीचे पहिले कार देखभाल केंद्र पुण्‍यात सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- किमत आणि वेळ या सर्वांची बचत करणारी देशातील पहिले इन्स्टासर्व्ह कार देखभाल सुविधा महिंद्र फर्स्ट चॉईस कंपनीने आज पुण्यात सुरु केले. येत्या ३१ मार्च अखेर कंपनी महाराष्ट्रात आणखी ३५ कार देखभाल सेवा केंद्रे सुरु करणार असून त्यात पुणे, नागपूर आणि मुंबईचा समावेश आहे, अशी माहिती महिंद्र आणि महिंद्रच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख राजीव दुबे यांनी दिली.

महिंद्र फर्स्ट चॉईसने पुण्यातील दुसरे देखभाल केंद्र हडपसर भागात दीड कोटी रुपये खर्चून स्थापन केले आहे. त्याचे उदघाटन केल्यानंतर दुबे म्हणाले, की कार उत्पादकाने दिलेली वॉरंटी संपल्यावर अनेकांना सोयीच्या ठिकाणी आणि वेळ वाचवणारी देखभाल सेवा हवी असते. हे लक्षात घेऊन कंपनीने पाच वर्षापूर्वी सुरु केलेल्या या व्यवसायाला भक्कम प्रतिसाद मिळतो आहे. सर्व कंपन्यांच्या कारची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. पुण्याचा वाढता ग्राहक लक्षात घेऊन हिंजवडी, पिंपरी आणि विमाननगरमध्ये येत्या मार्च अखेर आणखी तीन सेवा केंद्रे सुरु केली जातील. नागपूरला दोन आणि मुंबईत तीन नवी केंद्रे सुरु केली जाणार आहेत. महाराष्ट्रासह देशातील निमशहरी भागात यापुढे विस्तार केला जाणार आहे. महिन्याला एक हजार कार देखभाल दुरूस्‍ती करण्याची या केंद्राची क्षमता आहे.

कंपनीच्या विस्तार योजनेची माहिती देताना ते म्हणाले, की आगामी पाच वर्षात देशात आणखी ४५० देखभाल आणि सेवा केंद्रे सुरु केली जातील. त्यातील बहुतेक फ्रंचायझी तत्वावर असतील. अशा केंद्रामुळे रोजगार उपलब्धता वाढणार आहे. दर्जेदार कार देखभाल सेवा देणाऱ्या यंत्रणेची पुण्यासह देशात कमतरता आहे असे कंपनीला पाहणीत आढळले आहे

सेकंडहँड कारना अधिक मागणी
मंदी असो व नसो सेकंडहँड कार नव्या कारपेक्षा अधिक विकल्या जात असल्याचे दुबे यांनी सांगितले. सध्या तो दर नव्या कार विक्रीपेक्षा दुप्पट आहे. सध्या मंदी असल्याने वाहनांची मागणी कमी होणार असली तरी दरडोई उत्पन्नात होत असलेली वाढ आणि रस्त्यांचे वाढते जाळे यामुळे सेकंडहँड कारचा खप नव्‍यापेक्षा जास्त राहील यात शंका नाही असेही त्यांनी सांगितले.