आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahindra, Honda, Tata May Hike Car Prices News In Marathi

होंडा, टाटा, महिंद्राच्या सर्व कार एप्रिलपासून महागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा कार्स आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. टाटा मोटर्स 1 ते 2 टक्क्यांनी किमती वाढवण्याच्या विचारात आहे. होंडा आणि महिंद्राने अद्याप किती वाढ करायची हे ठरवले नसले तरी एप्रिलमध्ये कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी (ऑटोे विभाग) प्रवीण शहा यांनी सांगितले, कच्च्या मालाच्या किमती खूप वाढल्या आहेत. उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिलपासून सर्व कारच्या किमती वाढवण्याचा महिंद्राचा विचार आहे. कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढवायची याबाबत अद्याप निश्चित ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, एप्रिलमध्ये किमती वाढवण्याचा निर्णय झाला असला तरी त्या किती आणि केव्हा वाढवायच्या याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे.

होंडा कार्सच्या सूत्रांनी कारच्या किंमतवाढीला दुजोरा दिला. सूत्रांनी सांगितले, एप्रिलपासून कारच्या किमती वाढवण्याची चर्चा सध्या कंपनीत सुरू आहे. एप्रिलपासून किमती वाढण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्सने सर्व कारच्या किंमतवाढीचे संकेत दिले आहेत. कंपनीच्या मते, एप्रिलपासून सर्व प्रवासी वाहनांच्या किमती 1 ते 2 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत.

सध्याच्या किमती
होंडाच्या कार सध्या मॉडेलनिहाय 3.99 लाख ते 24.36 लाख रुपयांदरम्यान आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या देशात उत्पादित कारच्या किरकोळ विक्रीच्या किमती 5.43 लाख ते 14.48 लाख रुपयांदरम्यान आहेत. सर्व किमती एक्स-शोरूम, दिल्लीच्या आहेत.

किमतीतील उतार-चढ
हंगामी अर्थसंकल्पात कारवरील आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये महिंद्राने कारच्या किमती 13 ते 49 हजार रुपयांनी कमी केल्या होत्या. होंडा कार्स इंडियानेही कारच्या किमतीत कपात केली होती. आता या कंपन्या कारच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत.