आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक कार ई-20 दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने पहिली इलेक्ट्रिक कार ई-20 बाजारात आणली. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत दिल्ली गेट येथे ई-20 चे अनावरण करण्यात आले. या वेळी कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्राही उपस्थित होते.

किंमत- 5.96 लाख रुपये

फीचर्स : दोन दरवाजे, चार आसन क्षमता
न्यू जनरेशन लिथियम-आयन बॅटरी
थ्री फेज इलेक्ट्रिक इंडक्शन मोटर
फुल चार्जिंगसाठी पाच तास
एका चार्जिंगमध्ये 100 किलोमीटर
जीपीएस नॅव्हिगेशन, कि-लेस एंट्री

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग फीचर्स : ब्रेक लावल्यानंतर बॅटरी चार्ज सुविधा

- दिल्लीत इलेक्ट्रिक कारवर 29 टक्के सबसिडी, त्यामुळे ऑन रोड किंमत 5.96 लाख रुपये.
- महिनाभरात मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, चंदीगड,बंगळुरू येथे दाखल होणार.