आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahindra Launched Formula E Racing Car In The Indian Market

Auto Expo: भारतात पहिल्यांदाच लॉन्च झाली ही कार, 3 सेकंदात गाठते 100चा स्पिड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिंद्रा ग्रुपच्या फर्म आणि इलेक्ट्रिक व्हेइकलने महिंद्रा रेवोने ऑटो एक्सपोमध्ये फॉर्मूला ई कार लॉन्च केली आहे. या प्रकारची भारतात लॉन्च झालेली ही पहिलीच कार आहे. महिंद्रानेही ही कार FIA फॉर्मूला चॅम्पियनशिपमध्ये सहभागी करण्यासाठी ही कार डिझाइन केली आहे. या रेसमध्ये भाग घेणा-या 9 टिमपैकी महिंद्रा एक आहे. या कारमध्ये 240Kw मोटार आहे जी जवळपास 270bhpच्या बरोबर आहे.
ही कार अवघ्या 3 सेकंदात 100चा स्पिड गाठते. ही कार 5000mm लांब आणि 1800mm रूंद आहे. या कारचे वजन जवळपास 800 किलो आहे. या कारमध्ये ड्राइव्हरसाठी पुश-टु-पास बटन देण्यात आले आहे, जे 67kW अतिरिक्त पॉवर देते. ही पॉवर समोरच्या कारला ओव्हरटेक करण्यासाठी कामी येते. म्हणजेच बटन दाबताच याची स्पिड वाढते कारण इंजिनला 67kW अतिरिक्त पॉवर मिळते.
ई-रेसिंग कारसोबतच महिंद्राने XUV500 आणि क्वांटो कारही लॉन्च केल्या आहेत. XUV500ही हायब्रिड टेक्नोलॉजीने तयार केलेली पहिली SUV कार आहे ज्यात डिझल आणि मॅन्युअल आहे.
पुढील स्लाइडवर पाहा ई-कार लॉन्चिंगचे काही खास फोटो...