आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahindra & Mahindra Launch At Mumbai Car Verito Vibe

महिंद्रा आता छोटेखानी मोटारींच्या बाजारपेठेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वाहन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आता लहान मोटारींच्या बाजारपेठेत उडी मारली आहे. सेडान प्रकारातील ‘व्हेरिटो व्हाइब’ ही महिंद्राची नवी मोटार आता मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटार या छोटेखानी मोटारींच्या बाजारपेठेत जम बसवलेल्या कंपन्यांशी टक्कर देणार आहे.
अबकारी शुल्काचा लाभ लांबी कमी तसेच 1.5 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन असल्याने ‘व्हेरिटो व्हाइब’ मोटारीला अबकारी शुल्काचा लाभ मिळणार आहे. दीड लिटर किंवा त्यापेक्षा कमी डिझेल इंजिन क्षमता तसेच 1.2 लिटर वा त्यापेक्षा कमी पेट्रोल इंजिन क्षमता आणि लांबी चार मीटरपेक्षा कमी असणाºया मोटारींना अबकारी शुल्काचा लाभ देण्यात येतो. विशेष म्हणजे रेनॉच्या विश्वासार्ह व इंधनक्षम 1.5 लिटर डीसीआय डिझेल इंजिनाचे पाठबळ या कारला असल्याचे कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे प्रवीण शहा यांनी अनावरणप्रसंगी सांगितले.

खास भारतीय ग्राहकांसाठी ऐसपैसपणा, विश्वासार्हता तसेच खास क्रॉसओव्हर स्टाइल यामध्ये एक नवा ट्रेंड आणलेल्या या नव्या मोटारीमध्ये चालकासाठी अद्ययावत माहिती यंत्रणा असून त्यामुळे मायलेज, तापमान, अंतर याविषयी ‘रिअल टाइम’ आधारावर माहिती मिळू शकणार आहे. मोटार बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेत ‘व्हेरिटो व्हाइब’मुळे नवी संधी मिळणार असून मोटारप्रेमींना अपेक्षित असलेली स्टाइल, पुरेशी जागा, सुरक्षा आणि इंजिन कामगिरी अशा सर्वोत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. व्हेरिटोच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या असल्याने भारतीय रस्त्यांसाठी ही नवीन मोटार अत्यंत साजेलशी असल्याचे कंपनीच्या आॅटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष प्रवीण शहा यांनी अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले.

अबकारी शुल्काचा लाभ
लांबी कमी तसेच 1.5 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन असल्याने ‘व्हेरिटो व्हाइब’ मोटारीला अबकारी शुल्काचा लाभ मिळणार आहे. दीड लिटर किंवा त्यापेक्षा कमी डिझेल इंजिन क्षमता तसेच 1.2 लिटर वा त्यापेक्षा कमी पेट्रोल इंजिन क्षमता आणि लांबी चार मीटरपेक्षा कमी असणाºया मोटारींना अबकारी शुल्काचा लाभ देण्यात येतो. विशेष म्हणजे रेनॉल्टच्या विश्वासार्ह व इंधनक्षम 1.5 लिटर डीसीआय डिझेल इंजिनाचे पाठबळ या नव्या मोटारीला मिळाले आहे.

‘व्हेरिटो व्हाइब’चे फीचर्स
सी-पिलरवर पहिल्यांदाच एलईडी लाइट स्ट्रिमिंग टेललॅम्प,
अन्य हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट सेडानमधील रिअर सीट स्पेसच्या तुलनेत पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा.
खड्डे चुकवून आरामशीर मोटार चालवण्याचा अनुभव देणारे आधुनिक सस्पेन्शन
इंधन क्षमता : 20.8 किलोमीटर प्रतिलिटर
अतिरिक्त सुरक्षेसाठी मागच्या बाजूला क्रॉस - मेंबर
मांड्यांना चांगला आधार मिळण्यासाठी आरामदायी आसनव्यवस्था

किंमत
व्हेरिटो व्हाइब डी 2 : 5.63 लाख
व्हेरिटो व्हाइब डी 6 .49 लाख रु.
(एक्स शोरूम मुंबई)