आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोडिओ यूझेडओ’ स्कूटर घालणार तरुणांना भुरळ, किंमत : 47,957 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तरुणाई लाडोळ्यांसमोर ठेवून महिंद्रा समूहातील महिंद्रा टू व्हीलर्स लि. कंपनीने ‘स्पोर्टी रोडिओ यूझेडओ’ 125 सीसी इंजिन क्षमता असलेली आकर्षक स्कूटर सादर केली आहे.

दीर्घकाळात उत्तम कामगिरी, कमी देखभाल आधुनिक असलेली स्कूटर तरुणांचे लक्ष वेधून घेईल अशी आहे. तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आलेली ही एक परिपूर्ण स्कूटर असून तंत्रज्ञानाने या स्कूटरला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे महिंद्रा टू व्हीलर्सचे सीओओ वीरेन पोपली यांनी सांगितले.

>स्कूटरचा वेग वाढवताना वा जोरात ब्रेक लावल्यानंतर घसरायला होऊ नये म्हणून खास प्रकारे डिझाइन केलेल्या, टू टोन ड्युएल टेक्शर सीटमुळे स्कूटरचे रूप आणखी खुलते.

> या स्कूटरमध्ये सहज वापरता येईल असा चार्जिंग पॉइंट असून त्यामुळे मोबाइल तसेच इतर डिजिटल उपकरणे चार्ज करता येऊ शकणार आहेत.