आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahindra To Invest $33 Million In Trucks And Buses, New Products

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्रा करणार 200 कोटींची गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेली महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा आपल्या ट्रक आणि बस उत्पादनांना बळकटी देण्यासाठी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवीन उत्पादनांच्या संशोधनासाठी अतिरिक्त 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे.

आक्रमक गुंतवणूक योजना राबवतानाच कंपनीने पूर्वाश्रमीच्या ‘महिंद्र नेव्हीस्टार ऑटोमोटिव्ह लिमिटेड’ या कंपनीचे आता ‘महिंद्रा ट्रक अँड बसेस लिमिटेड’ (एमटीबीएल) असे नामकरण करण्यात आल्याचे महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन आणि कृषी उपकरण विभागाचे अध्यक्ष डॉ. पवन गोयंका यांनी जाहीर केले. एमबीटीएल ही महिंद्रा समूहाची पूर्णत: मालकीची उपकंपनी असेल.

एमबीटीएलचा ट्रक आणि बस व्यवसायाचे कामकाज स्वतंत्र करून तो महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रामध्ये समाविष्ट करण्याचादेखील कंपनीचा विचार आहे. परंतु त्यासाठी नियामक मान्यता मिळणे बाकी असल्याचे स्पष्ट केले. एलसीव्हीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावित कंपन्या स्वतंत्र केल्यानंतर ट्रक आणि बस व्यवसाय हा स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे. देशातल्या व्यावसायिक वाहन उद्योगातील स्थान आणखी बळकट करणे हा यामागील उद्देश असल्याचे गोयंका म्हणाले.