आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रा पुढील वर्षात देणार तीन नव्या वाहनांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आता स्थानिक बाजारपेठेतील स्थान आणखी भक्कम करण्याचा िवचार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षात दाेन छाेटेखानी एसयूव्ही यासह एकूण तीन नवीन वाहने बाजारात आणण्याची याेजना आखली आहे.
दुचाकी विभागात प्युजाे माेटारसायकल कंपनीतील ५१ टक्के भांडवली िहस्सा खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या महिंद्राने फ्रान्समधील या कंपनीची वाहन उत्पादने आणण्यासाठी भारताबराेबरच जागतिक बाजारपेठेवरदेखील लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही वाहने एका संपूर्ण नव्या मंचावर सादर करण्यात येणार असल्याचे
कंपनीचे कार्यकारी संचालक पवन गाेएंका यांनी सांगितले.
चाकण प्रकल्पावर भर
काेरियातील सँगयाँग या सहयाेगी कंपनीच्या मदतीने इंजिनांची नवीन मालिका विकसित करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या वर्षाच्या प्रारंभी महिंद्रा अँड महिंद्राने पुण्याजवळील चाकण प्रकल्पात चार हजार काेटी रुपयांची गुंतवणूक करून वार्षिक वाहन उत्पादन क्षमता ७.५ लाख वाहनांवर नेण्याचे जाहीर केले हाेते.