आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahindra To Present Another Stylish Scooter Rodeo Rz

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्रा आणणार ‘रोडिओ आरझेड’ स्कूटर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । ड्युरो डीझेड या दुचाकीला ग्राहकांकडून मिळालेल्या लक्षणीय प्रतिसादानंतर महिंद्रा टू व्हीलर्स कंपनी आता या महिन्यात रोडिओ आरझेड ही आणखी एक स्टायलिश पण तितकीच शक्तिशाली स्कूटर बाजारात आणण्याचा विचार करीत आहे.
रोडिओ आरझेड या बाजारात येणा-या स्कूटरमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये असून तरुणाईबरोबरच आजच्या मॉडर्न पती - पत्नींच्या पसंतीसही ती उतरेल, असा विश्वास महिंद्रा टू व्हीलर्सच्या विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष वीरेन पोपली यांनी सांगितले. रोडिओ आणि ड्युरो या दोन स्कूटर्स ब्रॅँडच्या माध्यमातून कंपनीने 3 लाख विक्रीचा टप्पा पार केला असून देशभरात सध्या या दोन ब्रॅँडचे जवळपास 1 लाख ग्राहक आहेत. महिंद्रा टू व्हीलर्सच्या 125 सीसीच्या शक्तिशाली स्कूटर सर्व क्षेत्रांतील ग्राहक वापरतात. नवीन महिंद्रा ड्युरो डीझेड ही कुटुंबासाठीची स्कूटर म्हणून समोर आली आहे. महिंद्रा रोडिओ ही नावीन्यपूर्ण आणि समकालीन स्कूटर असून, तरुण जोडप्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद आहे.