आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahindra Two Wheelers Launched Gusto Scooter, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्रा गस्टो स्कूटर वेधणार लक्ष, चालकाच्या गरजेनुसार आसनात बदलाची सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुचाकीमध्ये स्कूटरला वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन महिंद्रा टू व्हीलर्स लिमिटेड या कंपनीने आपली बहुप्रतीक्षित ‘गस्टो’ ही नवीन स्कूटर सोमवारी बाजारात दाखल केली. ग्राहकांच्या नेमक्या गरजा ओळखून त्यानुसार करण्यात आलेले बदल हे या नव्या स्कूटरचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

संपूर्णपणे देशांतर्गत बनावटीची ही स्कूटर कंपनीच्या पुण्यातील अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्रात तयार करण्यात आली आहे.

फीचर्स
* कुटुंबातील प्रत्येकाला चालवता येऊ शकेल अशी उंची कमी-जास्त करता येण्याजोगी सीट
*सोयीस्कर फ्रंट किक आणि क्विक स्टोअरेजचा कप्पा अशा अनेक नव्या सोयी आहेत.
*सुधारित आणि उच्च कार्यक्षमतेचे १०० सीसी क्षमतेचे एमटेक इंजिन आहे.
* चाकाचा विस्तृत आकार आणि ट्यूबरहित चाके यामुळे खडतर रस्त्यांवरही चांगली चालते.

किंमत : ४३००० रु, (डीएक्स) आणि ४७,००० रु. (व्हीएक्स)