आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राची वाहने 0.5 टक्क्यांनी महागली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन बाजारात सध्या विक्रीच्या निसरड्या वाटेवरून वाटचाल सुरू असतानाही वाहननिर्मितीत आघाडीवर असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने एक्सयूव्ही 500 आणि रेक्स्टन या दोन एसयूव्ही वगळता सर्व वाहनांच्या किमतीत किरकोळ 0.5 टक्क्यांनी वाढ केल्याचे जाहीर केले आहे.


जून महिन्यात महिंद्राची विक्री जवळपास 8 टक्क्यांनी घसरलेली असली तरी दुस-या बाजूला रुपयाच्या अवमूल्यनाचा मोठा फटका कंपनीला बसून उत्पादन खर्चाचा भार वाढला आहे. परिणामी कंपनीला तातडीने सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करावी लागत असल्याचे कंपनीच्या वाहन विभागाचे सीईओ प्रवीण शहा यांनी सांगितले. साधारणपणे ही सर्व वाहने तीन ते सहा हजार (त्या त्या वाहनावर अवलंबून) रुपयांनी महाग झाली आहेत.


जूनमध्ये वाहन उद्योगाची एकूणच विक्री घसरली असून त्यासाठी रुपयाच्या घसरणीमुळे इंधनांच्या किमतीत झालेली वाढ, चढे व्याजदर, एसयूव्हींवरील अतिरिक्त अबकारी शुल्क याचा नकारात्मक परिणाम वाहन विक्रीवर झाला असल्याचे शहा म्हणाले.