आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रा व्हेरिटो डी 6 कडून चांगल्या मायलेजची अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी कार 16 किमी प्रतिलिटर इतका मायलेज देत असेल तर ती ठीक असल्याचे म्हटले जाते; परंतु महिंद्राने व्हेरिटोच्या डी-6 मॉडेलमध्ये सुधारणा केल्यानंतर ती 19 किमी प्रतिलिटरपर्यंत मायलेज देत आहे. या मॉडेलचे इंजिन फार कार्यक्षम नसतानाही गर्दीच्या रस्त्यांवर ही कार चांगले मायलेज देते. या कारमधून प्रवास करताना रस्त्यांवरील दृश्य चहूबाजूंनी सहजपणे पाहता येते. यामुळे गर्दीतून बाहेर पडणे सोपे जाते. विंडो बटण दरवाजाच्या भागात बसवले आहे. वायपर्सची हालचाल अधिक करण्यात आली आहे. या कारचे इंटेरियर पांढ-या रंगाचे असल्यामुळे थंडावा जाणवतो.


इंधन क्षमता : कारच्या मायलेजबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही.
पॉवर मिरर : विंग मिररपासून स्विचची जागा अगदी योग्य ठिकाणी आहे.
लाइट फॅब्रिक : सीटचा रंग छान आहे. पण तो लवकर मळण्‍याची शक्यता आहे.
बॉटल होल्डर : यात एक लिटरची बाटली ठेवण्‍यास अडचण होते.
किंमत : 8.95 लाख (ऑन-रोड, मुंबई )