आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahindra Very Soon Launches Pantero And Centuro In Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरी प्रतिबंधक यंत्रणेसह महिंद्राची 'पँटेरो' लवकरच बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महिंद्रा टु व्‍हीलर कंपनी लवकरच 'पँटेरो' ही मोटारसायकल महाराष्‍ट्राच्‍या बाजारपेठेत सादर करणार आहे. रिमोट लॉक, चोरी प्रतिबंधक यंत्रणेबरोबर इतर अत्‍याधुनिक सुविधाही या दुचाकीत बसवण्‍यात आल्‍या असून याची किंमत 45 हजार रूपये इतकी असेल, अशी माहिती कंपनीचे उपाध्‍यक्ष धर्मेंद मिश्रा यांनी दिली. कंपनीतर्फे मार्च महिन्‍यात सेन्‍टूरो हे दुसरे मॉडेलही सादर करण्‍यात येणार आहे.

महिंद्राच्‍या पुणे येथील संशोधन केंद्रात या दोन्‍ही मॉडेलचा विकास करण्‍यात आला असून केवळ दुचाकीमध्‍ये नवे तंत्र आणण्‍यावर हे केंद्र लक्ष देणार आहे. या दोन्‍ही दुचाकीमध्‍ये रिमोट लॉक, चोरी प्रतिबंध यंत्रणा, इंधन किती शिल्‍लक आहे आणि किती किलोमीटर अंतर जाऊ शकेल, हे दर्शवणारी यंत्रणा यामध्‍ये उपलब्‍ध आहे. शहरी भागात पार्किंगचा प्रश्न लक्षात घेऊन वाहन कुठे लावले आहे हे विसरणारा ग्राहक असल्याने ते शोधून काढू शकेल अशी बझर यंत्रणाही या मॉडेलमध्ये आहे. लॉक करण्यास बनविलेल्या की मध्ये अंधारात प्रकाशझोत देऊ शकेल अशी सुविधा उपलब्ध केली असल्‍याची माहिती मिश्रा यांनी दिली.

तसेच, महिंद्रा टु व्हीलर कंपनी येत्या पाच वर्षात आणखी ५०० कोटी रुपये गुंतविणार असून पुण्यात स्थापन केलेल्या संशोधन आणि विकास केंद्रात १५० कोटी रुपये गुंतविले आहेत.