आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - नुकतेच सरलेले वर्ष हे भारतीय वाहन उद्योगासाठी ख-या अर्थाने ‘एसयूव्ही’ वर्ष ठरले. त्यातूनही एसयूव्ही निर्मितीत आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅँड महिंद्रासाठी तर ते चांगलेच फलदायी ठरलेले आहे. एसयूव्हीला ग्राहकांकडून मिळणारा लक्षणीय प्रतिसाद लक्षात घेऊन कंपनीने आता प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी एसयूव्ही 500, क्वांटो आणि त्सॅँगयॉँग रेक्स्टन या नवीन एसयूव्हींच्या उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
क्वांटोने बाजारात आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांतच 12 हजार बुकिंगची नोंद केली आहे. या नव्या एसयूव्हीची मासिक उत्पादन क्षमता वाढवून 3,500 वाहनांपर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे. त्याचप्रमाणे एसयूव्ही 500 ची उत्पादन क्षमता प्रतिमहिना 4,500 पर्यंत नेण्यात येणार आहे अगदी अलीकडेच बाजारात आलेल्या त्सॅँगयॉँग रेक्स्टनने प्रारंभीच 1,500 बुकिंगची नोंद केल्यामुळे महिंद्रा अॅँड महिंद्राला आपली उत्पादन क्षमता प्रतिमहिना 500 वाहनांनी वाढवावी लागली आहे. रेक्स्टन या एसयूव्हीचे सीकेडी स्वरूपातील सुटेभाग दक्षिण कोरियातून आयात केले जातात आणि त्याची जुळवणी महिंद्राच्या चाकण येथील प्रकल्पात केली जाते.
विक्रीत वाढ
क्वांटो आणि एसयूव्ही 500 या दोन्ही एसयूव्हींच्या बुकिंगसाठी महिंद्रा देशभरात आणखी काही केंद्र सुरू करणार आहे. त्सँगयाँग रेक्स्टनचे बुकिंग सध्या केवळ 9 शहरांतच उपलब्ध असून आतापर्यंत 1,500 बुकिंग झाले आहे. स्कॉर्पिओ एसयूव्ही 500, क्वांटो, व्हेरिटोसह विक्री डिसेंबरमध्ये 17.68 टक्क्यांनी वाढली आहे.
प्रतीक्षा कालावधी
एसयूव्ही 500 2 ते 6 आठवडे
क्वांटो 3 ते 6 आठवडे
रेक्स्टन 2 ते 4
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.