आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख क्षेत्रांची वाढ मंदावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नैसर्गिक वायू, पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने आणि खते या क्षेत्रांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे देशातील प्रमुख क्षेत्रांची वाढ घसरली आहे. मागील वर्षातल्या 5.8 टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात प्रमुख क्षेत्रांची वाढ घटून 1.7 टक्क्यांवर आली आहे; परंतु ऑक्टोबर महिन्यातील 0.6 टक्के नकारात्मक वाढीच्या तुलनेत आठ प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीत थोडीफार सुधारणा झाली आहे.
कोळसा, कच्चे तेल, पोलाद, सिमेंट, विद्युत या काही प्रमुख क्षेत्रांच्या देशातल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 38 टक्के वाटा आहे. एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत या प्रमुख क्षेत्रांनी यंदाच्या आर्थिक वर्षात 2.5 टक्के वाढ नोंद केली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत ही वाढ 6.7 टक्के होते.
उत्पादन क्षेत्राने केलेल्या सुमार कामगिरीमुळे या अगोदर ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 1.8 टक्क्यांनी घसरण झाली होती. त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनंतर औद्योगिक उत्पादन नकारात्मक पातळीत आले आहे.
औद्योगिक आकडेवारीवर परिणाम : प्रमुख क्षेत्रांच्या मंदावलेल्या कामगिरीचा नोव्हेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीवर परिणाम होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांच्या म्हणण्यानुसार परिस्थितीत अतिशय चढ-उतार असून त्याचा आयआयपीवर परिणामाची शक्यता आहे.