आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make A Policy For Returns Big Loans Form Industrilist

बड्या लोकांकडून कर्जवसुलीसाठी ठोस पावले उचला- चिदंबरम यांच्या बँकाना सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धनिक प्रवर्तक आणि आजारी कंपन्या देशाला परवडणा-या नाहीत. त्यामुळे कर्जवसुलीसाठी बॅँकांनी ठोस पावले उचलावीत, असा कडक इशारा वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी कंपन्यांना दिला आहे.

धनवान प्रवर्तक आणि आजारी कंपनी असे चालणार नाही. अतिरिक्त पैसा आणल्यानंतर कर्जाची परतफेड करणे हे कंपन्यांचे कर्तव्य आहे. प्रसंगी धनवान प्रवर्तकांकडून कर्जवसुली करा. प्रवर्तकांनी अतिरिक्त रक्कम न आणल्यास ते उद्योगातील व्यवसायासाठी घातक ठरू शकते, असे चिदंबरम म्हणाले. राष्ट्रीयीकृत बॅँका आणि वित्तीय संस्थांच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उद्योगांना कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता बॅँका आपल्या निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण सुधारण्यासाठी आणखी भक्कम पावले उचलतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या ढोबळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 71,080 कोटी (मार्च 2011) रुपयांवरून गेल्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत 1.55 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.