आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा समभागांतून बनवा दिवाळी ते दिवाळीपर्यंतचा पोर्टफोलिओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेअर बाजार सध्या आपल्या उच्चांकी पातळीच्या आसपास आहे. मात्र अजूनही काही समभाग असे आहेत की, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवणे शक्य आहे. आर्थिक वर्ष २०१४ च्या प्रारंभापासून आतापर्यंत बाजार सातत्याने वाढ दर्शवत आहे. असे असले तरी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत आता काहीशी सुस्ती दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, बाजार आता कन्सोलिडेशनच्या मूडमध्ये आहे. सध्याच्या पातळीवर आणखी काही प्रमाणात विक्री दिसून येण्याची शक्यता आहे. चांगले फंडामेन्टल्स असलेल्या समभागात गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचे तज्ज्ञ सुचवत आहेत. गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओत पुढील दिवाळीपर्यंत टाटा कम्युनिकेशन्स, व्होल्टाज,फिनिक्स, मिल्स, एमसीएक्स, बजाज इलेक्ट्रिकल्स, ब्रिटानिया यांचा समावेश करता येईल.

सहा शेअर्सचा दिवाळी फराळ
एमसीएक्स खरेदी करा : यूबीएसने एमसीएक्स एक्स्चेंज खरेदीसाठी १०५० रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे.
खरेदी का : बहुतांश ब्रोकरेज कंपन्यांची पसंती. ट्रेडर्सच्या मते, कंपनीचा खराब काळ संपला आहे. एमसीएक्सवर नवे सौदे करण्यास एफएमसी मंजुरी मिळाली आहे.
टाटा कम्यु. घ्या : रेलिगेअरचा ४२५ रुपये स्तरावर गुंतवणुकीचा सल्ला
खरेदी का : पहिल्या तिमाहीचे निकाल खराब, मात्र टाटा कम्युनिकेशन्सचे निकाल अपेक्षेनुसार राहिले. कंपनीच्या डेटा कारभारात २४ टक्क्यांहून जास्त वाढीची अपेक्षा आहे.
व्होल्टासची खरेदी : सीएलएसएचा २९२ रुपये स्तरावर खरेदीचा सल्ला
खरेदी का : एसी बाजारातील दिग्गज कंपनी. एमईपी क्षेत्रात सुधारणेने कंपनीला मोठा लाभ होण्याची अपेक्षा. कच्च्या मालाच्या किमतीत घसरणीने नफा वाढण्याची शक्यता.
बजाज इलेक्ट्रिकल्स खरेदी करा: यूबीएसकडून ३७५ रुपये स्तरावर गुंतवणुकीचा सल्ला
का खरेदी करावी : कंपनीचा मजबूत ब्रँड, मोठे वितरण जाळे. व्यापारात चांगल्या वाढीची शक्यता. आर्थिक वर्ष १५ मध्ये कंपनीचे उत्पन्न, नफ्यात चांगली वाढ होण्याची शक्यता.
फिनिक्स मिल्स खरेदी करा : सीएलएसएने ३९० रुपयांच्या स्तरावर खरेदी लक्ष्य निश्चित केले आहे.
का करावी खरेदी : आर्थिक सुधारणांमुळे उत्पन्न वाढणार. कंपनीचे उत्पन्न रेंट कारभारातून आहे. आरईआयटीतून कंपनीला सुलभरीत्या रक्कम उभी करण्यास मदत मिळणार आहे.
ब्रिटानिया खरेदी करा : फर्स्टकॉलचा १६५० रुपये स्तरावर गुंतवणुकीचा सल्ला
का करावी खरेदी : पहिल्या तिमाहीत नफ्यात २६ टक्के वाढ राहिली. साखर व गव्हाच्या किमती स्थिर राहिल्यास खर्च कमी होईल.