आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make In India: 12 Adavanced Trainning Institute For Skilled Human Resourec

मेक इन इंडिया अभियान: कुशल मनुष्यबळासाठी १२ एटीआय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मेक इन इंडिया' अभियानाला गती देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपयांच्या खर्चातून १२ अत्याधुनिक प्रशिक्षण संस्थांची (एटीआय) स्थापना करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार व रोजगार मंत्रालय रोजगार व प्रशिक्षण महासंचालनालयाच्या गरजापूर्तीसाठी तसेच व्यावसायिक व कुशल मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासाठी एकूण २७ एटीआयची स्थापना करण्यात येणार आहे.

औद्योगिक क्षेत्रात नवसंकल्पना येण्यासाठी व त्याला चालना मिळण्यासाठी खासगी भागीदारीवर भर देतानाच संचालनालयाने या संस्था सार्वजनिक -खासगी भागीदारीतून (पीपीपी) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक प्रशिक्षण विकास व समन्वयासाठी हे संचालनालय सर्वोच्च संघटना आहे. संचालनालयाच्या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात देशातील विविध ठिकाणी २०० कोटींच्या खर्चातून १२ एटीआयची स्थापना करण्याचा प्रस्ताव आहे. यातून ९२०० व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
असे होणार काम
२७ अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था उभारण्याची योजना
१२ अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था पहिल्या टप्प्यात
९२०० व्यावसायिकांना यात प्रशिक्षण मिळणार
मेक इन इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक स्पर्धेत सक्षम बनवण्यासाठी कौशल्य, स्तर आणि वेगावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असण्यावर भर दिला आहे. यालाच ‘मेक इन इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. यातून भारताला मॅन्युफॅक्चरिंग केंद्र म्हणून िवकसित करण्यात येणार आहे.