आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
वाइजइन्व्हेस्ट अॅडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड
गुंतवणुकीच्या योग्य पर्यायांची निवड एखाद्याला किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे आणि तो किती रकमेची जोखीम सहन करू शकतो, त्यावर अवलंबून आहे. आपल्यापैकी काही स्वाभाविकपणे जोखीम विमुख असतात आणि फारच सुरक्षितपणे गुंतवणूक करतात, ज्यामुळे आपल्या बचतीत आणि गुंतवणुकीत वाढ करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. सुरक्षित आणि आक्रमक गुंतवणूक दृष्टिकोनाचा संबंध एखाद्याच्या पोर्टफोलिओत असणा-या विविध साधनांच्या प्रमाणाशी असतो.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीची वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध पर्याय देतात. तथापि, काही काळानंतर एखादा यशाची कोणती पातळी गाठेल, हे योग्य पर्यायाची निवड ठरवते. यात काहीच आश्चर्य नाही की एमएफ योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काय पाहावे याबाबतच्या संभ्रमामुळे एखाद्यासाठी निर्णय घेण्याची प्रक्रिया कठीण सिद्ध होते. वस्तुत: अनेक गुंतवणूकदारांचा त्यांच्यासमोर येणा-या प्रत्येक योजनेत गुंतवणूक करण्याकडे कल असतो. परिणामी ते एक असा पोर्टफोलिओ विकसित करतात, ज्यात अशा योजना असतात ज्या एक तर त्याच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी किंवा जोखीम प्रोफाइलशी मिळत्याजुळत्या नसतात.
गुंतवणूकदारांना काही मूलभूत तत्त्वे आणि इक्विटीज आणि डेटसारख्या योजनांच्या वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी योग्य वाटप असले पाहिजे. इतर काही घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे ते म्हणजे लोड स्ट्रक्चर, रोखीकरणीयता, वार्षिक खर्च आणि पोर्टफोलिओची उलाढाल. उपलब्धीच्या दृष्टीने काय अपेक्षा करावी आणि कामगिरीचे मोजमाप कसे करावे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे.
खराखुरा जोखीम विमुख गुंतवणूकदार पारंपरिक स्थिर उत्पन्न साधनांचा मोठ्या प्रमाणावर पक्षपाती असतो. तथापि, करपश्चात उपलब्धी सुधारण्यासाठी, अधिक कर सवलती देणा-या आणि रोखीकरणीय असणा-या विविध डेट आणि डेटसंबंधित योजनांचा विचार करणे आवश्यक आहे.
त्यानंतर काही समतोल गुंतवणूकदार आहेत, जे त्यांची उपलब्धी सुधारण्यासाठी त्यांच्या गुंतवणुकीच्या बाबतीत काही जोखीम घेऊ इच्छितात. जोखमीच्या पातळीच्या आधारे ते मासिक प्राप्ती योजना, बॅलन्स्ड फंड आणि फंड ऑफ फंड्ससारख्या म्युच्युअल फंडाच्या योजना घेऊ शकतात.
गुंतवणूकदारांसाठी अनेक पर्याय उपलब्ध
एखाद्या आक्रमक गुंतवणूकदारासाठी म्युच्युअल फंडांकडून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वैविध्यपूर्ण इक्विटी फंडांव्यतिरिक्त, अपॉर्च्युनिटी फंड्स, मिड-कॅप फंड्स, काँट्रा फंड्स आणि विविध क्षेत्रीय फंड्स आहेत. साधारणपणे असे मानले जाते की तरुण लोक आणि ज्यांच्या जबाबदा-या कमी आहेत असे लोक आक्रमकपणे गुंतवणूक करतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की नियमितपणे इक्विटी फंडात गुंतवणूक केल्याने एकूण उपलब्धीच वाढते असे नाही, तर काही कालावधीनंतर एखाद्यासाठी बचत करणे आवश्यक असणारा डोईभारही सोपा होतो. हे म्युच्युअल फंडांच्या मदतीने शक्य होते.
नॉन-परफॉर्मन्स फंड
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, त्यांच्यापाशी नॉन-परफॉर्मन्स फंडातसुद्धा डील करण्याची योजना असणे हे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया रोजच्या रोज कामगिरीवर लक्ष ठेवण्याची सवय लावून घेण्याने सुरू व्हावी. आवश्यक असेल तर एखाद्याने नॉन-परफॉर्मन्स योजनेतून माघार घेण्याससुद्धा मागेपुढे पाहू नये. त्याच वेळी, एखाद्याला गुंतवणूक केलेल्या फंडाच्या गुणवत्तेबद्दल खात्री असेल तर अल्पकालीन चंचलतेचा सामना करावा लागल्यास पॅनिक बटण दाबण्याची गरज नाही. दीर्घकालीन आणि नियमित गुंतवणूकदारासाठी, चढउतार एक संधी देतात आणि प्रासंगिक गुंतवणूकदार साधारणपणे ती चुकवतात.
hrustagi@yahoo.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.