आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Your Mobile Like Computer With The Help Of Software

PHOTOS: या सॉफ्टवेअरच्या मदतीने मोबाइललाच बनवा कॉम्प्युटर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वायरलेस तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोनमध्ये असणार्‍या मल्टीमीडिया फाइल्स संगणकात पाठवणे किंवा दुसर्‍या उपकरणाशी जोडणे आता कठीण राहिलेले नाही. आता बाजारात अशी अँप्लिकेशन उपलब्ध आहेत. अँपच्या मदतीने एका वायफाय नेटवर्कशी जुडत अनेक कामे करता येतात.


ग्रुप प्ले
पहिल्यांदा सॅमसंगच्या गॅलक्सी एस 4 या स्मार्टफोनमध्ये वापरला जात होता, पण आता हा इतर गॅलेक्सी मॉडेल म्हणजे ग्रँड, एस 3, नोट 2, टॅब 10.1 आणि नोट 10.1 मध्ये सुद्धा वापरला जातो. ग्रुप प्लेसोबत वायफायचा वापर करून उपकरणात असणारे संगीत( म्युझिक फाइल्स) फोटो आणि डॉक्युमेंट्स इतर नऊ उपकरणांसोबत शेअर करता येतात. हे करताना एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते की इतर सर्व उपकरणात देखील एकच वायफाय नेटवर्कचे कनेक्शन असावे. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधून फ्री ग्रुप प्ले अँप डाउनलोड करावा लागतो. अँपमध्ये शेअर केल्या जाणार्‍या फाइलचा प्रकार निवडू शकता. एकावेळी तुम्हाला अनेक फाइल निवडता येतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या अँपमध्ये एक पिन नंबर टाकावा लागतो. इतर उपकरणाशी जुडणे आणि शेअर सेशन आयडीवर जाण्यासाठी हा पिन नंबर उपयोगी ठरतो.

एअरड्रॉयड
डाटा ट्रान्सफर करण्यासाठी तुमचा अँड्राइड स्मार्टफोन वरचेवर संगणकाला जोडत असाल तर एअरड्रॉयड हा त्रास कमी करण्यात उपयुक्त ठरतो. हे सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत असून वायफायच्या मदतीने फोन आणि संगणकाच्या मध्ये संपर्क निर्माण करतो. हा वेब ब्राउजरचा वापर करत असल्याने संगणकात इतर सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याची गरज लागत नाही. हा अँप रन केल्यानंतर कोणत्याही ब्राउजरवर www.airdroid.comX ओपन करावे. यानंतर संगणकावर दिसणारा पासवर्ड अँपमध्ये टाकून एक सुरक्षित कनेक्शन सुरू करता येईल. याच्या मदतीने फोनवरून बॅकअप घेऊ शकता. ब्राउजरच्या मदतीने एसएमएस पाठवू किंवा स्वीकारू शकतो. आपल्या उपकरणावर नवे अँप डाउनलोड करू शकतो. फोन स्टोरेजची माहिती घेण्यासोबत इतर प्रोग्रॅम सुद्धा चालवू शकतो. अशी सुविधा ब्लॅकबेरी झेड 10 मध्ये इनबिल्ट स्वरुपात उपलब्ध आहे.