आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Malaysian Tycoon Billionaire Ananda Krishnan News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

681 अब्ज रुपयांची संपत्ती असलेल्या उद्योगपतीचा मुलगा बनला बौद्ध भिक्षुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंदा कृष्णन: उद्योगपती
जन्म: 1 एप्रिल 1938
शिक्षा: हार्वर्डमध्ये विद्यापीठातून एमबीए

परिवार: पहिले लग्न राजकुमारी यांच्याशी झाले. त्यांच्याकडून कृष्णन यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. तर दुसरे लग्न हेलन मेरी हीच्यासी झाले. हेलन पॅरिसच्या संगीत मुद्रण हाऊसची मालकीण आहे. हिच्याकडून कृष्णन यांना मुलगी आहे.

चर्चेत का आहेत
681 अब्ज रुपयांची संपत्ती असलेल्या या मलेशियन उद्योगपतीला सीबीआयने एअरसेल आणि मॅक्सिस व्यवहारात आरोपी ठरवले आहे.
दक्षिण पूर्व आशियातील दुसरी आणि जगातील 99 क्रमांकावर असलेल्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये कृष्णन यांच्या नावाचा समावेश होतो. मात्र या अब्जाधीशाचा मुलगा 2008 ला अचानक बेपत्ता झाला. कृष्णन यांनी त्याचा खुप शोध घेतला. या दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांच्या मुलासारखाच दिसणारा एक व्यक्ती उत्तर थायलंडच्या बौध्द भिक्षुकांच्या मठात दिसल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच कृष्णन तेथे गेले. तेव्हा त्यांचा मुलगा केस कमी केलेले, भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या अवस्थेत दिसला. हे दृश्य पाहताच कृष्णन यांना धक्का बसला.

महलासारख्या घरात राहणार्‍या मुलाला जंगलात पाहून कृष्णनला राहावले नाही. त्यांचा मुलगा आता बौध्द भिक्षुक बनला होता. त्याला खुप समजावले पण त्याच्या काहीच फायदा झाला नाही. त्यांनी त्यांच्या मुलाला कमीत कमी माझ्यासोबत जेवण कर असा आग्रह केला, मात्र अजाहने त्यासही नकार दिला. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, "मला माफ करा, मी तुमचे आमंत्रण स्वीकारू शकत नाही. मला दुसर्‍या भिक्षुकांप्रमाणेच भिक्षा मागूनच स्वतःचे जेवण मिळवायचे."
अनंदा यांना या गोष्टीचे खुपच दुःख वाटले, की अब्जावधीची संपत्ती असूनही ते त्यांच्या मुलासोबत जेऊ शकले नाही. यानंतर अनंदा यांना परतावे लागले. मात्र अनंदा जेव्हा केव्हा घरात कौटुंबिक कार्यक्रम ठेवतात तेव्हा ते त्याला बोलावतात आणि तो ही येतो. 2011 मध्ये अनंदा यांचा 70 वा वाढदिवस होता. तेव्हा हा वाढदिवस त्यांना त्यांच्या मुलासोबत साजरा करायचा होता. त्यांनी त्यांच्या मुलाला बोलावले आणि त्याला आपल्या खासगी जेटने भूटानच्या पलिकडे घेऊन गेले. येथे त्यांच्या मुलाने त्यांचा वाढदिवस साजरा केला.
मलेशिया पब्लिक वर्क डिमार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी इंग्रज अनंदाच्या आजोबांना श्रीलंकेमधील जाफनामधून येथे घेऊन आले होते. यानंतर ते श्रीलंकेत परत गेले नाही आणि मलेशियातील लिटिल इंडिया म्हटल्या जाणार्‍या ब्रिकफील्डसमध्येच रमले. त्यानंतर आनंदाचे वडिलही येथेच सरकारी नोकरी करू लागले.
अनंदा सुरूवातीपासूनच हुशार होते, यामुळे मेलबर्न युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्यूएशन करण्यासोबतच ते बेटींगही करत होते. नेहमी लो प्रोफाईलमध्ये राहणार्‍या आनंदा यांचा बिझनेस एंटरटेन्टमेंटपासून ते ऑईल, पॉवर, शिपिंग, टेलिकम्यूनिकेशन आणि प्रॉपर्टी फील्ड्स एवढा विस्तारलेला आहे. त्यांच्या कमाईतील एक चतुर्थांश भाग हा गॅम्बलिंगमधून येतो.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, कृष्णन आणि बौद्ध भिक्षु बनलेल्या त्यांचा मुलगा अजाहचे फोटो...