आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय पर्यटकांवर मलेशियाचे लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पर्यटन व्यवसायावर मलेशियाची अर्थव्यवस्था ब-या च अंशी अवलंबून आहे. त्यांच्या या पर्यटन उद्योगाला भारतातील पर्यटकांनी दिलेला प्रतिसाद प्रतिवर्षी वाढतो आहे. त्यामुळे ‘टुरिझम मलेशिया’ या मलेशियन पर्यटन विकास मंडळाने मलेशियन एअरलाइन्सच्या साथीने भारतात 7 ते 18 जानेवारी या कालावधीत मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि नवी दिल्ली या चार शहरांमध्ये पर्यटन आणि उद्योग या क्षेत्रातील संबंधितांशी आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मलेशियातील 18 प्रमुख पर्यटन कंपन्या, 21 प्रमुख हॉटेल समूहांचे प्रतिनिधी, 6 उत्पादक आणि तीन मलेशियन सरकारच्या पर्यटन विभागांचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी भारतात दाखल झाले आहेत.

मुंबईत ‘इस्ताना बुदाया’ या ग्रुपने मलेशियातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्या वेळी भारतातील पर्यटन क्षेत्रातील मान्यवर मंडळींशी 2013 या वर्षातील पर्यटन उद्योगाशी संबंधित बाबींवर चर्चा झाली.

भारतीय मलेशियाच्या प्रेमात
भारतीय पर्यटकांचे मलेशियातील पर्यटन वाढले आहे. 2010 मध्ये 6 लाख 90 हजार, 2011 मध्ये 6 लाख 93 हजार

भारतीय पर्यटक मलेशियात गेले होते.
*2012 च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 5 लाख 14 हजार भारतीय पर्यटकांनी मलेशियाला भेट दिली होती.
*2013 या वर्षाकरिता भारतीय पर्यटकांच्या संख्येत 7 लाखांपेक्षा अधिक वाढ होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
भारतातील प्रमुख शहरांपासून मलेशियात जाणा-या विमान फे-यांची संख्या आठवड्याला 54 फे-यांपर्यंत वाढवण्यात आली.