आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malware Steals Credit Card Info From Swipe Machines

सावधान! स्‍वाइप मशिनमधून क्रेडिट कार्डची गुप्त माहिती चोरतो हा व्हायरस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- क्रेडीट कार्ड होल्डर्ससाठी धोक्याची घंटी आहे. एका कॉम्प्युटर व्हायरसने सध्या थैमान घातले आहे. रिटेल आउटलेट्सवरील स्‍वाइप मशिनमधून हा व्हायरस क्रेडिट कार्डची गुप्त माहिती चोरण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील जवळापास 700 रिटेल आउटलेट्समधील स्‍वाइप मशिनींना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे कार्ड होल्‍डरचे नाव, अकाउंट नंबर, कार्ड एक्‍सपायरी डेटा, सीव्हीव्ही कोड आदी गुप्त माहिती चोरली जाते. या व्हायरसवर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास भविष्यात तो मोठ्याप्रमाणात पसरेल आणि क्रेडिट कार्ड होल्डर्सची मोठी डोकेदुखी होऊ शकते.

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सरकारी संस्था 'कॉम्‍प्‍यूटर इमरजेंसी रिस्पॉन्‍स टीम'ने व्हायरस शोधून याबाबत अलर्ट जारी केला आहे. 'BrutPoS' असे व्हायरसचे नाव आहे. रिस्‍पॉन्‍स टीमच्या सल्लागारानुसार, 'BrutPoS' हा कॉम्‍प्‍यूटर मॅलेवेयर पॉइंट ऑफ सेल सिस्टिम तसेच विंडोज बेस्‍ड सिस्टिमला टार्गेट करतो. दुकानातील कॅश काउंटर, जेथे ग्राहक कार्डद्वारा ऑनलाइन पेमेंट करतात, त्याला 'पॉइंट ऑफ सेल' असे म्हटले जाते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, युजरनेम व पासवर्डला टार्गेट करतो हा व्हायरस...