आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीचा तडाखा : उत्पादन घटल्याने आंबा महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आंबा कितीही खावासा वाटला तरी यंदाच्या वर्षी जरा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या महिन्यात काही राज्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी देशातील आंब्याचे एकूण उत्पादन 20 टक्क्यांनी घटल्यामुळे फळांचा राजा महागण्याची शक्यता ‘असोचेम’ या संस्थेने व्यक्त केली आहे.

कोकणाबरोबरच देशातल्या अन्य भागातील आंब्याचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी घटले असून ते 18 दशलक्ष टनांवर आले आहे. निर्यातीची मागणी असली तरी तीदेखील यंदा फिकी ठरण्याची भीती असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी व्यक्त केली.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेशात झालेल्या अवकाळी पावसाचा जवळपास 50 टक्के आंब्याच्या झाडांना फटका बसला असल्याचे असोचेमने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. या पाच राज्यांमध्ये आंब्याची आवक होण्यास विलंब लागणार असल्यामुळे या रसाळ फळाच्या किमती वाढण्याची श्क्यता असोचेमने म्हटले आहे

निर्यात मागणीत वाढ :
संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, बांगलादेश आणि अन्य देशांमधून निर्यातीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्राहकांच्या या पसंतीच्या फळाच्या उपलब्धतेवर ताण येण्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात आली आहे.