आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनातील आवश्यक लक्ष्ये लक्षात घेऊन प्राधान्यक्रम ठरवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारिका वित्तीय नियोजनबाबत विचार करते आहे. जीवनात सर्व काही मिळावे अशी तिची इच्छा आहे. वित्तीय नियोजनामुळे जीवनात सर्व काही मिळेल, असे तिने गृहीत धरले होते. मात्र तिच्या जीवनातील महत्त्वाच्या बाबी किंवा लक्ष्ये कोणती हे विचारल्यानंतर ती गोंधळली. तसेच मर्यादित साधनांच्या मदतीने आपण लक्ष्य साध्य करू शकत नसल्याचेही तिच्या लक्षात आले. त्यातच मी तिच्या लक्ष्याच्या प्राधान्याविषयी विचारताच तिचा गोंधळ अजून वाढला.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक लक्ष्ये असतात. काही जबाबदारीचे तर काही इच्छांचे तर काही आवश्यक लक्ष्ये असतात. बर्‍याचदा स्वप्न आणि लक्ष्य याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक असणार्‍ या बाबींचा समावेश लक्ष्यामध्ये होतो, हे लक्षात घ्यावे.
जीवनातील लक्ष्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ज्या स्वप्नांशी किंमत निगडित असते तेच त्या व्यक्तीचे लक्ष्य असते. आपल्या इच्छा अनेक असतात. उदाहरणार्थ, मोठे घर, कार, चांगल्या ठिकाणी फिरायला जाणे, मुलांचे उज्जवल भवितव्य, आरोग्यदायी आणि आरामदायी निवृत्ती आदी. मात्र, जी लक्ष्ये साध्य करण्यात आनंद, समाधान आणि रोमांचक अनुभव येतो तीच खरी लक्ष्ये असतात. मात्र मर्यादित साधनांसह आपली सर्व महत्त्वाची लक्ष्ये साध्य करण्यासाठी लक्ष्यांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक असते. लक्ष्यांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा हे जाणून घेऊ...
1. जीवनात आपल्याला जे साध्य करायचे आहे, त्याची यादी बनवावी. लक्ष्ये निश्चित आणि मोजता येण्यासारखी असावीत. आपली स्वप्ने कागदावर उतरवली तर ती लक्ष्य बनतात, असे म्हटले जाते. त्यामुळे जीवनात जे मिळावे असे वाटते ते कागदावर उतरवून ठेवावे.
2.बनवलेली यादी पुन्हा पुन्हा वाचा. सर्व लक्ष्यांची चार श्रेणीत विभागणी करा. जसे- महत्त्वाचे, फारसे महत्त्वाचे नसणारे, तातडीचे, तातडीचे नसणारे. महत्त्वाचे म्हणून मुलांचे भविष्य, गरजा, कर्जाची परतफेड आदींचा समावेश होतो. निर्धारित लक्ष्य किती काळात साध्य करायचे आहे, त्यावरून त्याची अर्जेंसी ठरवता येते. जे लक्ष्य एक ते तीन वर्षांत साध्य करू इच्छिता ते तातडीचे (अर्जंट) या श्रेणीत येईल.
आता जे महत्त्वाचे आणि तातडीचे आहे, अशा लक्ष्यांना प्राधान्यक्रमात वरचे स्थान मिळेल. तर बिन महत्त्वाचे आणि तातडीचे नसतील अशा लक्ष्यांना प्राधान्यक्रमात दुय्यम स्थान मिळायला हवे. तर जे महत्त्वाचे नाही तसेच तातडीचेही नाही अशी लक्ष्ये आपोआप बाद होतील.
3. आपल्या लक्ष्यांच्या बाबतीत वास्तववादी बना. जेव्हा तुम्ही तातडीचे आणि महत्त्वाचे लक्ष्य निश्चित करू शकाल तेव्हाच असे बनणे शक्य आहे. महत्त्वाची लक्ष्ये वेळेवर साध्य न होणे हे आपण समजू शकतो. उदाहरणार्थ, निवृत्तीचे नियोजन आणि मुलांचे भविष्याचे नियोजन दोन्ही जीवनातील महत्त्वाची लक्ष्ये आहेत.मात्र, मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी अनेक योजना बाजारात आहेत मात्र निवृत्तीनंतरचे जीवन आपल्या बचतीवरच व्यतीत करावे लागते. कार खरेदी करणे हे महत्त्वाचे आहे, मात्र क्रेडिट कार्डची बाकी चुकवणे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. कारण असे केले नाही तर आपल्या वित्तीय स्थितीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते.
या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या लक्ष्यांसाठी प्राधान्यक्रम निश्चित करावा. त्यानंतर परिस्थितीनुसार आपण आपले लक्ष्य निश्चित करू शकतो.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
manikaran.singal@dainikbhaskargroup.com