आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्व्हेस्टमेंट: महिलांच्या उत्तम भवितव्यासाठी पाच सूत्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबाच्या आर्थिक बाबतीत महिलांनी सक्रिय सहभागी व्हायला हवे. केवळ कुटुंबाच्याच नव्हे, तर स्वावलंबनासाठी तसेच स्वत:वरील विश्वासवृद्धीसाठी हे आवश्यक आहे. येथे पाच सूत्रांचा उल्लेख करण्यात आला असून यामुळे महिलांना आपल्या कुटुंबाच्या व स्वत:च्या उत्तम भवितव्यासाठी ही सूत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

1. बजेटिंग: कोणत्याही आर्थिक नियोजनात बचत नव्हे तर खर्च अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. समजा खर्चावर नियंत्रणच नसेल तर कोणतेही आर्थिक नियोजन यशस्वी होणार नाही. या क्षेत्रात महिला उत्तम काम करू शकतात. एकीकडे महिला जास्त खर्चिक असतात असे मानले जात असले तरी दुसरीकडे त्यांच्यात कुटुंबाच्या अंदाजपत्रकानुसार चालण्याचे कसबही त्यांच्या अंगी असते. कुटुंबातील सदस्यांच्या खर्चावर नियंत्रण आणि प्रभाव त्या टाकू शकतात. उदाहरणार्थ, मुलांचा पॉकेटमनी ठरवणे, किराणा, कपडे, बाहेर खाणे आदीवर किती खर्च करावा हे महिलांच्या हाती असेल तर ती त्याचा चांगला वापर करते.
2. विमा: जेव्हा कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न असतो तेव्हा विम्याची ताकद दुर्लक्षून चालणार नाही. एक महिला या नात्याने स्वत:चा आणि पतीचा आयुर्विमा आणि अपघात विमा किती असावा. यामुळे एखाद्या दुर्घटनेत दोघांचेही काही बरे वाईट झाल्यास विम्याची रक्कम कुटुंबाच्या मदतीस येते, हे निश्चित करता येते. समजा तुम्ही नोकरी करणाºया असाल आणि तुमच्यावर अवलंबून असणारे असतील तर स्वत:चा आयुर्विमा उतरवणे जास्त आवश्यक ठरते.

3. स्वत:चे कर नियोजन स्वत: करा : स्वत: करनियोजन केल्यास कर बचतीतून बºयापैकी रक्कम वाचवता येते. नोकरी करणाºया असाल तर कर नियोजन आधीपासूनच तयार असेल. बचत आणि गुंतवणूक वाढवून ते जास्त चांगले बनवावे लागेल. स्वत:च्या नावे मॅरेज गिफ्ट घेऊन, आई-वडिलांकडून भेटी घेऊन हे साधता येईल. माता -पिता किंवा हिदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) कडून काही वडिलोपार्जित संपत्ती मिळल्यानेही कर फाइल मजबूत करता येते. टॅक्स फाइलने पैशांवर स्वत: नियंत्रण ठेवता येते. प्राप्तिकर रिटर्न नियमित भरावा.

4. गुंतवणुकीच्या निर्णयात सहभागी व्हा : बहुतेक महिला गुंतवणूक योजना बनवण्याच्या बाबतीत स्वत:ला दूर ठेवतात. त्या नेहमी याची जबाबदारी कुटुंबातील पुरुष, सदस्य जसे- पिता, भाऊ, पती किंवा मुलांवर टाकतात. मात्र असे करणे योग्य नाही. महिलांना हिशेब ठेवता येत नसल्याचा सर्वसाधारण समज आहे. मात्र गुंतवणुकीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदा का महिलांनी गुंतवणुकीला सुरुवात केली आणि त्याचे महत्त्व लक्षात आल्यास महिला हे काम अत्यंत सुलभरीत्या करतात.

5. निवृत्ती : निवृत्ती हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या वयात आपल्या तब्येतीकडे लक्ष तर द्यावे लागतेच शिवाय आपल्याकडील पुंजीचे व्यवस्थापनही योग्य रीतीने करावे लागते. पतीबरोबर जॉइंट बँक अकाउंट, गुंतवणूक खाते, डी-मॅट खाते, म्युच्युअल फंड आदी असावे, याकडे प्रत्येक महिलेने लक्ष द्यावे. सर्व खात्यात योग्य प्रकारे नामनिर्देशन (नॉमिनी)असावे. कुटुंबाच्या सर्व आर्थिक बाबींची माहिती महिलांना असणे गरजेचे असते. आपले आणि पतीचे मृत्युपत्र व्यवस्थित लिहून ठेवावे. गरज भासल्यास त्याची अंमलबजावणी कशी करावी याचीही माहिती असावी.
(लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.)
(manikaran.singal@dainikbhaskargroup.com)