आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलपीजी वर केला 2000 कोटी रूपये खर्च - पंतप्रधान मनमोहनसिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- डिसेंबर2013 पर्यंत गॅस सिलिंडरसाठी दोन हजार कोटी रूपये अनुदान केंद्र सरकारने थेट हस्‍तातंर योजने अतंर्गत (डीबीटी) दिले असल्‍याची माहिती पतंप्रधान मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी दिल्‍लीतील नॉशनल मीडीया सेंटर येथे दिली. डीबीटी योजनेची अमलबजावणी योग्‍य पध्‍दतीने केल्‍यामूळे ही योजना देशातील सर्वसामान्‍य लोकांपर्यंत पोचली आहे. थेट हस्‍तांर योजने आंतर्गत 184 जिल्‍ह्यात ही योजना पोचली आहे. या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी अधार कार्डची पूर्तता करावी लागत होती.यासाठी आधारकार्ड योजना देशभरामध्‍ये राबवण्‍यात आली. या योजने आतंर्गत 51 कोटी जनतेपर्यंत आधार कार्ड पहोचले आहेत. केंद्र सरकारच्‍या 28 योजनेचा लाभ अधार कार्डच्‍या माध्‍यमातून घेता येणार आहे. चार कोटी ग्रहकांची बँक खाती आधार कार्डच्‍या माध्‍यमातून जोडली आहेत. देशतील 156 बँका सबसीडी हस्‍तांतरामध्‍ये प्रत्‍येक्ष सहभाग घेणार आहेत, अशी माहिती यावेळी पतंप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली.