आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीत उत्पादन क्षेत्राची वाढ मंदावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विजेचा तुटवडा आणि नवीन ऑर्डर्स मिळण्याचे घटलेले प्रमाण यामुळे जानेवारी महिन्यात उत्पादन क्षेत्राची वाढ मंदावून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली असल्याचे एचएसबीसी इंडियाने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळले आहे.

देशातील उत्पादनाचे मूल्यमापन करणारा एचएसबीसी इंडियाचा मॅन्युफॅक्चंिरंग मॅनेजर्स निर्देशांक डिसेंबरमध्ये 54.7 अंकांच्या सहा महिन्यांच्या विक्रमी पातळीवर गेल्यानंतर जानेवारीत तो घसरून 53.2 अंकांवर आला. त्याअगोदर नोव्हेंबर महिन्यात हा निर्देशांक 53.7 अंकांवर होता. हा निर्देशांक 50 अंकांच्या खाली गेल्यास ते घसरणीचे निर्देशक असते. खंडित विद्युत पुरवठ आणि नव्या ऑर्डर्सचा कमी झालेला ओघ यामुळे जानेवारी महिन्यात उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा वेग ओसरल्याचे एचएसबीसीचे मुख्य अर्थतज्ज्ञ लेफ एस्केसेन यांनी सांगितले.

नफ्यावर ताण, ग्राहक हैराण : वाढत्या उत्पादन खर्चामुळे नफ्यावर येणारा ताण हलका करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किमतीदेखील वाढवल्या असल्याचे एचएसबीसी इंडियाने म्हटले आहे.

आणि चांगली मागणी यामुळे ही वाढ कायम राखण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे विदेशी ग्राहकांची मागणी जास्त असल्यामुळे निर्यातीच्या नवीन ऑर्डर्समध्येदेखील सलग पाचव्या महिन्यात चांगली वाढ झाली आहे.

इंधनाचे चढे दर आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे उत्पादन खर्चदेखील सलग 46 व्या महिन्यात वाढला आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे नफ्यावर येणारा ताण हलका करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किमतीदेखील वाढवल्या असल्याचे एचएसबीसी इंडियाने म्हटले आहे.