आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Manufacturing PMI 52.90 Vs. 53.50 Forecast

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंग तीन महिन्यांच्या नीचांकावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या वाढीची गती कमी होऊन तीन महिन्यांच्या नीचांकावर आली आहे.डिसेंबरमध्ये ही वाढ दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणीचा ओघ घटल्याने जानेवारीतील एचएसबीसी इंडियाचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) घटून ५२.९ वर आला. डिसेंबरमध्ये तो ५४.५ वर होता.

एचएसबीसीचे भारतीय व्यवहार विभागाचे मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजल भंडारी यांच्या मते, जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुधारणांचे संकेत मिळत आहेत. उत्पादन व नव्या ऑडर्समध्ये सलग १५ व्या महिन्यांत वाढ झाली आहे. इंडेक्स ५० वर आहे म्हणजे देश-विदेशातील बाजारांतून ऑर्डर्स मिळत आहेत.

चीनमध्ये सलग दुसर्‍या महिन्यात घट
४९.७ मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जानेवारीत
डिसेंबरमध्ये होता ४९.६
कंपनी रोजगार संधीत सलग १५ व्या महिन्यांत घसरण दिसून आली.