आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजाराचा सावध पवित्रा, तेजीला तूर्त धोका नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मागील आठवड्यात अपेक्षेप्रमाणे प्रारंभी सतर्कता दाखवली. त्यानंतर फंडांनी तसेच सटोडियांकडून नव्या जोरदार खरेदीचे सत्र सुरू झाल्याने निफ्टीत तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यात निफ्टी 6112 आणि 5918 या कक्षेत राहील, असे नमूद केले होते. या दोन्ही भक्कम पातळ्या आहेत. शुक्रवारी निफ्टीने 5940.16 ही खालची, तर 6068.50 या उच्च पातळीला स्पर्श केला. या पातळ्या नमूद केलेल्या कक्षेतीलच आहेत. बाजारावर प्रभाव टाकणा-या काही घटकांमुळेच मी निफ्टीची कक्षा रुंदावलेली दिली होती. ही कक्षा रुंद ठेवली नसती तर ट्रेडसंदर्भात चुकीचे संकेत जाण्याची शक्यता होती. कारण घसरण होऊनही मंदीसदृश स्थिती नव्हती. क्रेडिट एजन्सी फिचच्या इशा-या नंतरही बाजारात तेजीचे वातावरण होते.

या इशा-या ने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला खरा, परंतु विदेशी फंडांनी बाजारात भरभरून पैसा ओतला. त्यामुळे बाजारात तेजी दिसून आली. इन्फोसिस आणि टीसीएस कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने तसेच घाऊक महागाई दराचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने बाजाराचा आत्मविश्वास दुणावला. देशातील सॉफ्टवेअर कंपनांवरचे मळभ हटल्याचे दिग्गज आयटी कंपन्यांच्या चांगल्या निकालांवरून स्पष्ट झाले. इन्फोसिसच्या उत्पन्नातील वाढीने केवळ इन्फोसिसच नव्हे, तर इतर आयटी कंपन्यांच्या शेअर्सचे फेरमूल्यांकन होत आहे.

डिसेंबरमधील घाऊक महागाईचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहिला. रिझर्व्ह बँक 29 जानेवारीला पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. महागाई घसरल्याने रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदरात कपात करण्याची शक्यता वाढली आहे. वादग्रस्त जनरल अँटी अव्हॉयडन्स रुल्स (गार)ची अंमलबजावणी एक एप्रिल 2016 पर्यंत लांबणीवर टाकण्याच्या घोषणेने बाजारात तेजीला धार आली. यामुळे विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात जोरदार खरेदी करतील की नाही याचे निराकरण झाले.

येत्या आठवड्यात विदेशी फंडांकडून जोरदार खरेदीची शक्यता आहे. त्यामुळे बाजार सकारात्मक राहील. मात्र, बाजार लवकरच नवे ट्रिगर शोधेल, कारण आरबीआयकडून 0.25 टक्के व्याजकपात व इतर सकारात्मक पावले उचलण्याची शक्यता याआधीच बाजाराने जाणली आहे. डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किमती वाढण्याच्या शक्यतेचा ताण संबंधित समभागांवर दिसतो आहेच. त्यामुळे बाजार सावध पवित्र्यासह सकारात्मक पातळीत राहण्याची शक्यता आहे.

जोपर्यंत निफ्टी 6012 पातळीवर आहे, तोपर्यंत बाजारात तेजीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. निफ्टीसाठी ही तात्कालिक आधार पातळी आहे. निफ्टी या पातळीखाली बंद झाल्यास त्यात करेक्शन येण्याचा हा पहिला संकेत असेल. निफ्टीला मग 5978 या पातळीवर सपोर्ट मिळेल. मात्र, हा आधार फारसा मजबूत नाही. जर विक्रीचा दबाव वाढला तर निफ्टी ही पातळी राखू शकणार नाही. या पातळीवर काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसे पाहिले तर 5912 या पातळीवर निफ्टीला चांगला आधार आहे, त्यावर बारकाईने नजर ठेवायला हवी.

बाजारात सकारात्मक वातावरण आहे, त्यामुळे निफ्टी आणखी वर जाण्याची अपेक्षा करण्यास हरकत नाही. निफ्टी त्यामुळे 6078 या पहिल्या सूचक पातळीपर्यंत पोहोचू शकतो. चांगल्या व्हॉल्यूमसह निफ्टीने ही पातळी ओलांडल्यास त्यास पहिला अडथळा 6121 पातळीवर मिळेल. तेथे त्यास मजबूत आधार मिळाल्यास त्यानंतर 6179 या पातळीवर निफ्टीला तगडा अडथळा आहे.
या आठवड्यात डेव्हलपमेंट अँड क्रेडिट बँक (डीसीबी), बँक ऑफ बडोदा आणि युनायटेड फॉस्फरस ऑफ इंडिया लिमिटेड या कंपन्या चार्टवर चांगल्या दिसून आल्या. डीसीबीचा मागील बंद भाव 50.20 रुपये आहे. पुढील टार्गेट 53 रुपये आणि स्टॉप लॉस 47 रुपये आहे. बँक ऑफ बडोदाचा मागील भाव 877.20 रुपये आहे. पुढील टार्गेट 892, तर स्टॉप लॉस 841 रुपये आहे, तर युनायटेड फॉस्फरस लिमिटेडचा मागील बंद भाव 136.65 रुपये आहे. पुढील टार्गेट 140, तर स्टॉप लॉस 132 रुपये आहे.
लेखक तांत्रिक विश्लेषक आणि
moneyvistas.com चे सीईओ आहेत.


Vipul.verma@dainikbhaskargroup.com