आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपन ऑफरने कंपन्यांना दिले 6510 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारातील थोडीफार मरगळ वगळता भागधारकांना फेब्रुवारी महिन्यात नोंदणीकृत कंपन्यांच्या तब्बल 6510 कोटी रुपयांच्या ओपन ऑफरचा लाभ झाला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या अकरा महिन्यांतील ओपन ऑफर्सने तिसर्‍यांदा कमाल पातळी गाठली आहे.
एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत 69 सार्वजनिक पब्लिक ऑफर्स भांडवल बाजारात आल्या आणि त्यांचे संकलित मूल्य जवळपास 46,583 कोटी रुपयांवर गेले आहे. पाच वर्षांतील ही सर्वात कमाल पातळी आहे. याअगोदर 2011-12 या वर्षात 19,305 कोटी रुपयांच्या ओपन ऑफर्स बाजारात आल्या होत्या.
बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या मासिक अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात बाजारात आलेल्या ओपन ऑफर्सने तिसर्‍यांदा कमाल मूल्याची नोंद केली आहे. अगोदर जूनमध्ये 29,242 कोटी रुपये आणि 2013-14 वर्षातल्या एप्रिलमध्ये 7,003 कोटी रुपये मूल्याच्या ओपन ऑफर बाजारात आल्या होत्या.
त्याअगोदर जानेवारी महिन्यात केवळ 94 कोटी रुपयांच्या तर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे 62 कोटी रुपये आणि 128 कोटी रुपयांच्या ओपन ऑफर आल्या होत्या. उर्वरित 3,3391 कोटी रुपयांचा निधी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत ओपन ऑफरच्या माध्यमातून उभारण्यात आला.
ऑक्टोबर पर्यंत बहर
जानेवारीत केवळ 94 कोटी रुपयांच्या तर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे 62 कोटी रुपये आणि 128 कोटी रुपयांच्या ओपन ऑफर आल्या होत्या. उर्वरित 3,3391 कोटी रुपयांचा निधी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत ओपन ऑफरच्या माध्यमातून उभारण्यात आला.